धनादेश न वटल्याने शिक्षा
By admin | Updated: May 8, 2014 17:52 IST
नाशिक : खात्यावर पैसे शिल्लक नसतानाही धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने चंद्रशेखर बोंडे यांना एक महिना शिक्षा सुनावली. बोंडे यांनी उमेश अरविंद भांबोरीकर यांच्याकडून पन्नास हजार रुपये हात उसनवार घेतले होते व ते परतफेडीसाठी धनादेश दिला. परंतु भांबोरीकर यांनी धनादेश वटण्यासाठी टाकला असता, खात्यावर पैसे शिल्लक नसल्याच्या कारणावरून तो परत आला. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी श्वेता चांडक यांच्यासमोर होऊन बोंडे यांना एक महिना शिक्षा व दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. भांबोरीकर यांच्यावतीने ॲड. स्वप्ना सातपूरकर यांनी काम पाहिले.