शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

शाहरूख, अजय देवगण व बच्चन परिवाराला ईडीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 13:00 IST

बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना विदेशात पाठविलेल्या पैशांसाठी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22- बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना विदेशात पाठविलेल्या पैशांसाठी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे. ईडीच्या या प्रश्नांना फक्त अभिनेता शाहरूख खानलाच नाही तर संपूर्ण बच्चन परिवाराला ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे. बच्चन परिवारातील सगळ्या सदस्यांकडून ईडीने गेल्या 13 वर्षांत विदेशात पाठविलेल्या पैशांची माहिती मागवली आहे. तसंच अभिनेता अजय देवगण यालाही ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. यातून अजयने देशाच्या बाहेर पाठविलेल्या पैशांची माहिती सादर करायला ईडीने सांगितलं आहे. 
आणखी वाचा
राहुल गांधीच्या मोदींवरील टीकेला स्मृती इराणींचं उत्तर
शिवसेनेने साथ सोडली तरी अदृश्य हात भूकंप येऊ देणार नाहीत - देवेंद्र फडणवीस
संजय कोठारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या सचिवपदी निवड

अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अजय देवगण यांना जून महिन्यात ईडीने फेमा कायदा अंतर्गत नोटीस पाठवली होती.  फेमा कायद्याच्या सेक्शन 37 अंतर्गत ईडीने तपासणी सुरू करण्याच्या आधी या कलाकारांकडून प्राथमिक माहिती मागवली जाऊ शकते. बॉलिवूडमधील एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि त्याच्या परिवाराला 2004 नंतर एलआरएस अंतर्गत व्यावसायिक दौऱ्यादरम्यान केलेल्या विदेशी देवाण-घेवाणीची माहिती द्यायची आहे. 2004 मध्ये रिझर्व बॅकेने लिब्रलाइज्ड रेमिटेंस स्कीम ( एलआरएस )सुरू केली होती. याच अंतर्गत बच्चन परिवाराला 2004 नंतरच्या विदेशी व्यवहाराची ईडीला माहिती द्यावी लागणार असल्याचं समजतं आहे. 

 
शाहरूखला ईडीचं समन्स
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अभिनेता शाहरूख खान याला समन्स बजावलं होतं. आयपीएलमधील शाहरूखच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून झालेल्या परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी यापूर्वी शाहरूखला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. २३ जुलैला त्याला ‘ईडी’समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या संघाचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकण्यात आले होते. त्यामुळे कंपनीला तब्बल ७३.६ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. याप्रकरणी मार्च महिन्यात ईडीने शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला आणि अन्य काही जणांना या नुकसानासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाची मालकी नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड आहे. सूत्रांच्या माहितीनूसार ‘ईडी’ला तपासणीदरम्यान समभाग विक्रीच्या या तब्बल १०० कोटींच्या व्यवहारात परकीय चलन कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. जय मेहता यांच्या मालकीच्या सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात हा व्यवहार झाला आहे. नाइट रायडर्स स्पोर्ट्स ही मॉरिशसमधील नोंदणीकृत कंपनी असून, तिची मालकी शाहरूखची रेड चिली कंपनी आणि अभिनेत्री जुही चावला व तिचा पती जय मेहता यांच्याकडे आहे. २००८-०९ मध्ये शाहरूखने या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता, तो त्याने जय मेहताच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्ट या कंपनीला दहा रुपयांना विकला. हा व्यवहार करताना जाणुनबुजून समभागांची किंमत कमी दाखवली गेल्याचा संशय आहे. या संपूर्ण व्यवहारात मोठ्याप्रमाणावर अनियमितता असून यामध्ये समभाग मुल्यांकनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे.