शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मंत्रालय सूचविणार उत्पन्नवाढीचे उपाय

By admin | Updated: October 1, 2015 22:32 IST

महाराष्ट्रातील सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसोबतच मद्य, सिगारेट आणि शीतपेयावरील विक्रीकरही वाढविला

प्रमोद गवळी ,नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसोबतच मद्य, सिगारेट आणि शीतपेयावरील विक्रीकरही वाढविला. वाढीचे हे चक्र एवढ्यावरच थांबणार नसून महागाईचे आणखी धक्के बसू शकतात. कारण निकट भविष्यात सर्व मंत्रालये राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी दर महिन्याला नवनवीन सूचना देणार आहेत.महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सदर प्रतिनिधीशी बोलताना उपरोक्त संकेत दिले. ते म्हणाले की, निवडणुकीतील आश्वासनानुसार स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आणि टोल व्यवस्था बंद झाली आहे. त्यामुळे साहजिकच राज्याचे उत्पन्नही कमी होणार आहे. याचा अर्थ उत्पन्न वाढीसाठी दुसऱ्या उपाययोजना करणे बंद झाले असे नाही. येणाऱ्या दिवसात प्रत्येक मंत्रालयाला उत्पन्नवाढीसंदर्भात सूचना मागितल्या जाणार आहेत. याचे सादरीकरण त्यांना करावे लागणार आहे. महाराष्ट्र आघाडीवरइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुंतवणुकीची काय परिस्थिती आहे? असे विचारले असता देसाई यांनी सांगितले की, महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत किमान १० वर्षे आघाडीवर आहे. त्यामुळे आमची बरोबरी करणे अशक्य आहे. देशात होणाऱ्या एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) ३० टक्के महाराष्ट्रात होत आहे. याशिवाय एकूण निर्यातीत राज्याचे योगदान ३० टक्के आहे. अशाच प्रकारे सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) राज्याची भागीदारी १५ टक्के आहे. संपूर्ण देशात सर्वात मोठी लॅण्डबँक (८० हजार हेक्टर) आमच्याकडे आहे.औरंगाबादजवळ भूमीचे वाटपआमचे लक्ष केवळ मुंबई आणि पुण्याच्या आजूबाजूलाच नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉनने राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या शाखा उघडाव्यात अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही पुणे,औरंगाबाद आणि खालापूरची नावे सुचविली असल्याचे देसाई यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यात औरंगाबादजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या १० हजार हेक्टर जमिनीचे वाटप केले जाईल.स्वस्तात वीजराज्य सरकार विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना स्वस्त वीज देण्यास सक्षम आहे काय? असा प्रश्न विचारला असता देसाई यांनी होकारार्थी उत्तर दिले. बंद होणाऱ्या युनिटमुळे राज्याला वॅटवरील उत्पन्नापासून मुकावे लागते. अशात त्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणे हा चांगला उपाय आहे, असे ते म्हणाले.