तलावात बुडून मुलाचा मृत्यू
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० येथील तलावात बुडून लहान मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री बेपत्ता झालेल्या या मुलाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तलावात आढळून आला. पोहायला गेला असता बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तलावात बुडून मुलाचा मृत्यू
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० येथील तलावात बुडून लहान मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री बेपत्ता झालेल्या या मुलाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तलावात आढळून आला. पोहायला गेला असता बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.धीरज मिस्त्री (१२) असे या मयत मुलाचे नाव आहे. बालाजी टॉवरलगतच्या झोपडपीमधे राहणारा धीरज हा गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होता. संध्याकाळी घराबाहेर गेलेला धीरज रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानुसार रात्रीपासून त्याचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळी नेरूळ सेक्टर २० येथील तलावाच्या किनारी त्याचे कपडे आढळून आले. त्यामुळे नेरूळ अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर तलावात त्याचा शोध घेतला. अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तलावामधून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी अमृतानंद बोराडे यांनी सांगितले. तलावामध्ये पोहत असताना बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाजही बोराडे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)