शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

MIM च्या विरोधामुळे योगादिन वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे

By admin | Updated: June 4, 2015 18:10 IST

जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - जागतिक योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी योगासने करावीत अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. या सूचना म्हणजे सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून तरीही सर्वांनी स्वेच्छेने हा दिवस योगदिन म्हणून साजरा करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र मुस्लीम इत्तेहिदूल मुसलमीन या पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनी मात्र या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला असून भाजपाचा भारत हिंदूराष्ट्र करण्याच्या अजेंडाचा हा भाग असल्याचे म्हटले आहे.
भाजपाच्या प्रवक्त्यांनी योगाचा हिंदू धर्माशी सांगड घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे तर योगाची सक्ती करणे हे घटनेने नागरिकांना दिलेल्या आचार विचाराच्या स्वातंत्र्याच्या  विरोधी असल्याचे एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा जागतिक योगा दिन म्हणून जाहीर केला आणि जवळपास १७७ देशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, ज्यामध्ये अनेक मुस्लीम देशांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, योगविद्येचा जन्म झालेल्या भारतातच एमआयएमच्या माध्यमातून विरोध ठाकला आहे.