ऊस बिलाची थकबाकी न दिल्यास २२जूनपासून बेमुदत धरणे
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
स्वाभिमानी शेतकरी संघटनचा शासनाला इशारा पुणे : शेत कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊस बिलाच्या थकबाकीतील ३४०० कोटी रुपये शासनाने २०पर्यंत उपलब्ध करु न न दिल्यास २२जूनपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर संकुल येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, आंंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास मी उपोषण सुरु करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी ...
ऊस बिलाची थकबाकी न दिल्यास २२जूनपासून बेमुदत धरणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनचा शासनाला इशारा पुणे : शेत कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊस बिलाच्या थकबाकीतील ३४०० कोटी रुपये शासनाने २०पर्यंत उपलब्ध करु न न दिल्यास २२जूनपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर संकुल येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, आंंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास मी उपोषण सुरु करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितली. शेट्टी यांनी गुरुवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पत्रकारांना या बाबत माहिती देताना ते म्हणाले केंद्र शासनाकडून ६ हजार कोटी रुपयांचे पॅकेज साखर कारखान्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.राज्यातील साखर कारखान्यांच्या वाट्याला १८५० रुपये येणार आहेत. ऊस बिलाच्या थकबाकीतील ३४०० कोटी उपलब्ध करुन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ३० जून हे शेतकर्जाचे आर्थिक वर्ष असल्याने ३० जून पर्यंत ऊसाचे थकित बिलाचे थकित येणे शेतक-यांच्या खात्यात जमा न झाल्यास त्यांची मोठी अडचण येणार आहे.कोणताही दोष नसताना शेतक-यांची खाती थकबाकीदार होणार आहे. त्यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी सोसायट्यांकडून नवे कर्ज मिळणार नाही. व तो शासनाच्या विविध योजनांसाठी अपात्र ठरु शकेल. नाहक दंड व व्याज यांचा भुर्दंड त्यास भरावा लागणार आहे. राज्यातील शेतक-यांच्या या थकबाकीबाबत भावना खूप तीव्र् असून घामाचा मोबदला त्वरीत न मिळाल्यास त्यांना आवरणे खूप कठिण होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.