शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे ग्रामीण भागात वस्तूंचा खप घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 02:25 IST

गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, त्यातही दोन वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागावर झाला असून वस्तूंचा खप कमालीचा घटला आहे. शेतकऱ्यांसोबतच एफएमसीजी आणि फूड सेक्टरवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या चार वर्षांत देशाच्या कृषी विभागाचा विकासाचा दर अवघा १.६ टक्के राहिला. खरे तर हे लक्ष्य ४ टक्के होते. पाऊस कमी पडत असल्याने कृषी क्षेत्रात ही घसरण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.कमी पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस आणि आंबा यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. दुष्काळामुळे दोन्ही राज्यांत यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कृष्णा जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ५० टक्के होण्याची शक्यता असल्याचे कृष्णा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या सहायक संचालक एन. सुजाता यांनी सांगितले.पाऊस कमी झाल्याने उसाची लागवड कमी होऊन उत्पादनही घटले. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला. परिणामत: ऊसतोड कामगार लवकर घरी परतले आणि कारखान्यांचे गाळपही लवकर बंद झाले. दुष्काळग्रस्त भागात आम्हाला आर्थिक वृद्धी दिसत नाही. ग्राहक स्वस्त तेलाकडे वळले आहेत. त्यामुळे चांगल्या तेलाची विक्री घटली आहे.गारपीट, अवकाळीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसानअवकाळी पावसासोबत गारपिटीने १.३ कोटी टन गव्हाचे नुकसान होण्याचा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. कदाचित गव्हाची आयात करावी लागेल.असोचेमने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्पादनात घट झाल्याने चलनवाढ होऊ शकते. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, गव्हावरील आयात शुल्क घटवून १० टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी व्यापारी गव्हाची समांतर आयात करतील आणि गहू सहज उपलब्ध होईल, त्यामुळे स्टॉक आणि किमतीवरील दडपणही कमी होईल.९.३ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण त्यात आता १.३ कोटी टन घट होण्याची शक्यता आहे. सरकारला गव्हाची आयात करण्याचाही विचार करावा लागेल.