शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही दुष्काळाचेच ढग, अपुऱ्या मान्सूनची शक्यता

By admin | Updated: June 2, 2015 23:37 IST

तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो

नवी दिल्ली : तीव्र उन्हाच्या झळांनी काहिली वाढली असताना लवकर पाऊस पडण्याची आस लावून बसलेल्यांना लवकर बरसणारा मान्सून दिलासा देऊ शकतो, मात्र पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवलेला सुधारित अंदाज आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवू शकतो. यावर्षी ‘अपुऱ्या’ (डिफिशियन्ट) पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. हवामान खात्याने यापूर्वी दीर्घकालीन सरासरीच्या आधारे (एलपीए) ९३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित अंदाजानुसार ही आकडेवारी ८८ टक्क्यांपर्यंत राहणार असल्यामुळे दुष्काळाचे सावट घोंगावू लागले आहे. वायव्य भारताला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. एप्रिलमध्ये हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. आता ही सरासरी ८८ टक्क्यांवर आल्यामुळे अपुऱ्या मान्सूनच्या श्रेणीत मोडली गेली आहे. दरम्यान, सुधारीत हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राज्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहे.मान्सूनला आधीच विलंब झाला असून ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. खरीप पिके नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात. अपुऱ्या पावसाचा परिणाम भातरोवणीवर व तांदळाच्या उत्पादनावर होतो. देशाची ६० टक्के लोकसंख्या शेतीसंबंधी रोजगारावर निर्भर असून देशातील केवळ ४० टक्के शेती सिंचनाखाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)