शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर धरणात बुडून बालकाचा मृत्यू हिंगणे बुद्रूकची घटना : पोहताना घडली दुर्घटना

By admin | Updated: April 1, 2016 00:38 IST

जळगाव : वाघूर धरणात पोहोचण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रूक, ता.जामनेर येथे घडली.

जळगाव : वाघूर धरणात पोहोचण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रूक, ता.जामनेर येथे घडली.
हिंगणे बुद्रूक येथील रहिवासी मंगेश लक्ष्मण धोटे (वय १२) हा बालक गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावाशेजारी असणार्‍या वाघूर धरणाच्या पाण्यात सहकारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला होता. धरणाच्या काठावर पोहत असताना मंगेश आतमध्ये गेला. त्या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब पाहून त्याचे मित्र घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड केली; परंतु जवळपास कुणीही मोठी व्यक्ती नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या काही मित्रांनी गावात येऊन ही बाब लोकांना सांगितल्यावर धरणावर गर्दी झाली. पोहणार्‍या तरुणांनी मंगेशला पाण्याबाहेर काढले. नंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्याला दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
धोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
या घटनेमुळे धोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मयत मंगेशचे वडील लक्ष्मण धोटे हे शेतीचा व्यवसाय करतात. ते एका हाताने अपंग आहेत. मंगेश हा गावातील जि.प. शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. त्याला एक मोठा भाऊ व बहीण आहे. तो घरात सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका होता. मंगेश मनमिळावू स्वभावाचा होता. तो अभ्यासातही हुशार होता. त्याचे आकस्मिक जाणे सर्वांना चटका लावून गेले, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात व्यक्त केल्या.