शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणामुळे सूर्यफूल उत्पादनात घट

By admin | Updated: May 12, 2014 19:48 IST

सावरवाडी : उन्हाळी हंगामात पेरलेल्या सूर्यफूल पिकांचे बोगस बियाणे लागल्याने करवीर तालुक्यात सूर्यफूल पिकातून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. ऐन सूर्यफूल काढणीमध्ये उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे.

सावरवाडी : उन्हाळी हंगामात पेरलेल्या सूर्यफूल पिकांचे बोगस बियाणे लागल्याने करवीर तालुक्यात सूर्यफूल पिकातून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. ऐन सूर्यफूल काढणीमध्ये उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत सूर्यफूल पिकाची पेरणी करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या सूर्यफूल बियाणाचे खासगी बी-बियाणे कंपन्यांद्वारे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले होते. सूर्यफूल उगवणही थंडावली गेली होती.
ग्रामीण भागात ऐन उन्हाळा हंगामात सूर्यफूल पीक काढणीस सुरुवात झाली. काढणीच्यावेळी सूर्यफूल पिकाची फुले दाण्यांनी भरली नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकर्‍यांना यावर्षी चांगलाच आर्थिक फटका बसला.
सूर्यफूल हंगामातून शेतकर्‍यांना काहीही उत्पादन मिळाले नसल्यामुळे सूर्यफूल बियाणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. दरम्यान, राज्य शासनाने सूर्यफूल पीक क्षेत्राचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना बी-बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. (वार्ताहर)