शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दाढी काढा, अन्यथा जीव देईन; पत्नीची धमकी

By admin | Updated: July 19, 2016 05:58 IST

‘दाढी काढा अन्यथा जीव देईन’ अशी धमकी पत्नी देत असल्याने येथील एक मौलवी धर्मसंकटात सापडले आहेत.

मेरठ : ‘दाढी काढा अन्यथा जीव देईन’ अशी धमकी पत्नी देत असल्याने येथील एक मौलवी धर्मसंकटात सापडले आहेत. आपली पत्नी आपल्या इच्छेविरुद्ध परपुरुषांशी स्मार्टफोनवरून गप्पागोष्टी करते, असा आरोपही त्यांनी केला. अर्शद बद्रुद्दीन (३६) असे या मौलवींचे नाव असून, त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन पत्नीचे समुपदेशन करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी पंकज यादव यांना दिलेल्या तक्रारीत अर्शद यांनी म्हटले आहे की, ‘मी पेश इमाम असून, इस्लामचा सच्चा अनुयायी आहे. हापूड जिल्ह्यातील सहाना हिच्याशी २००१ मध्ये माझा विवाह झाला. तिला सलमान खान, शाहरूख खान या अभिनेत्यांसारखे दाढी केलेले लोक आवडतात. त्यामुळे विवाहानंतर मी दाढी ठेवू नये, अशी मागणी तिने केली. तिने एक स्मार्टफोनही विकत घेतला असून, त्यावरून ती परपुरुषांशी रात्रंदिवस बोलत असते.’ ‘माझ्यासारख्या मौलवीला दाढी ठेवावी लागते, हे मी तिला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बधत नाही. आम्हाला चार मुले झाली. तरीही तिने तिची मागणी सुरूच ठेवली आहे. सारखे फोनवर बोलत जाऊ नकोत, तसेच वळण मुलांना लागेल आणि मग त्यांना शिस्त लावणे कठीण बनेल, असे मी तिला वारंवार सांगितले. मात्र, ती ऐकत नाही. तिच्या या वर्तणुकीला मी वैतागलो आहे. मी अलीकडे तिच्यावर रागावलो, तेव्हा तिने रडायला सुरुवात करून, मुलांना विष पाजून जीव देण्याची धमकी दिली,’ असे त्यांनी म्हटले आहे.>पाश्चात्य पद्धतीच्या कपड्यांवरून भांडणईदनिमित्त पत्नी स्वत:साठी आणि मुलांसाठी पाश्चात्य पद्धतीचे कपडे खरेदी करू इच्छित होती. ईदच्या खरेदीसाठी तिच्यासोबत जाण्यास मी नकार दिल्यानंतर, तिने माझ्याशी भांडण करून आत्महत्येची धमकी दिली. ईदच्या दुसऱ्या दिवशी तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. मी आत डोकावलो असता, ती गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मला दिसले. मी लगेच कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावून दार तोडले. सुदैवाने तिला वाचविण्यात आम्हाला यश आले.