नाट्य स्पर्धांचा शनिवारी बक्षीस वितरण
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
आसखेड : जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्य स्पर्धेत यशस्वी शाळांचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यसभागृहात होणार आहे.
नाट्य स्पर्धांचा शनिवारी बक्षीस वितरण
आसखेड : जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्य स्पर्धेत यशस्वी शाळांचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यसभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद असणार आहेत. बक्षिसांचे वितरण सारेगमफेम ज्ञानेश्वर मेश्राम, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप व शिक्षणाधिकारी आदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शाळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपशिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.०००००