डॉ.प्रशांत चौधरी कार अपघातात ठार
By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST
जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ.प्रशांत चौधरी कार अपघातात ठार
जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.जुने बी.जे.मार्केटसमोर डॉ.चौधरी यांची प्रशांत पॅथॉलॉजी आहे, तर पत्नी वंदना चौधरी (एम.डी.) या स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्याच इमारतीत त्यांचा दवाखाना आहे. वरच्या मजल्यावर चौधरी दाम्पत्य वास्तव्याला आहेत.मुलगा निनाद व मुलगी शान्मयी हे दोघं मुंबईत शिक्षण घेत आहेत. त्यांना सोडण्यासाठी डॉ.चौधरी, त्यांची पत्नी डॉ.वंदना चौधरी, आई शशिकला चौधरी व वडील डॉ.प्रल्हाद चौधरी आदी जण इनोव्हा कारने (एम.एच.१९ ए.ई.१११८) मुंबईला जात होते.पुलावरुन पलटी झाली कार शिरवाडे वणी पिंपळगाव येथे पुलावर विरुध्द दिशेेन कार त्यांच्या कारच्या दिशेने आली. या कारला वाचविताना डॉ.चौधरी यांनी त्यांची कार रस्त्याच्या कडेला नेली. त्यात टायर फुटल्याने उंच पुलावरुन कार थेट खाली कोसळली.यावेळी कारने चार ते पलटी घेतली.त्यामुळे डॉ.चौधरी यांच्या डोक्याला जबर मार बसला तर कारमधील आई, वडील, पत्नी, व मुले यांना किरकोळ लागले. या अपघातानंतर त्यांना तातडीने नाशिक येथील अत्याधुनिक खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला.अमोदा ता.यावल हे त्यांचे मुळ गाव आहे. मोठे भाऊ मिलिंद चौधरी हे देखील जळगावातच वास्तव्याला आहेत. ते शेती करतात. मुलगी शान्मयी हीने नुकतीच मुंबईत बारावी सायन्सची परीक्षा दिली. मुलगा निनाद हा मुबंईतील वडाळा येथील विद्यालंकार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष कॉम्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा रायफल शुटींगचा खेळाडू असून नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदक मिळविले होते. मुलाच्या कर्तबगारीवर डॉ.चौधरी प्रचंड खुश होते.