शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील कोळसा खटला स्थगित

By admin | Updated: April 2, 2015 05:14 IST

आदित्य बिर्ला उद्योगसमूहातील हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालिबिरा-२ कोळसा खाणपट्टा देण्यासंबंधीच्या खटल्यात आरोपी करून विशेष न्यायालयाने

नवी दिल्ली : आदित्य बिर्ला उद्योगसमूहातील हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालिबिरा-२ कोळसा खाणपट्टा देण्यासंबंधीच्या खटल्यात आरोपी करून विशेष न्यायालयाने काढलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मोठा दिलासा मिळाला. २००५ मध्ये कोळसा मंत्रालयाचा कार्यभार डॉ. सिंग यांच्याकडे असताना या खाणपट्ट्याचे वाटप झाले होते.सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी या खटल्यात डॉ. सिंग यांच्याखेरीज हिंदाल्को कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. पारख, हिंदाल्को कंपनी आणि बी. शुभेंदू अमिताभ व डी. भट्टाचार्य या कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करून ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होण्यास समन्स काढले होते. या आरोपींनी या निर्णयाच्या विरोधात केलेल्या विशेष अनुमती याचिकांवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्या. व्ही. गोपाल गौडा व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने या सर्वांवरील समन्सना स्थगिती दिली. एवढेच नव्हे, तर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत विशेष न्यायालयाकडील  खटल्याचे पुढील कामकाजही सर्वोच्च न्यायालयाने तहकूब केले. विशेष न्यायालयाने दंड विधानाच्या अन्य तरतुदींखेरीज लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(डी) (३) अन्वये डॉ. सिंग यांच्यासह इतरांना आरोपी केले आहे. बिर्ला यांनी त्यांच्या याचिकेत या कलमाच्या घटनात्मक वैधतेसही आव्हान दिले आहे. न्यायालयाने यावरही केंद्र सरकार व सीबीआयला स्वतंत्र नोटीस जारी केली.त्यांचे निर्णय योग्यच होतेतालिबिरा कोळसा खाणपट्टा हिंदाल्को कंपनीस देण्याच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्णयात कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारी मानसिकतेची पुसटशी झलकही दिसत नाही. त्यामुळे मुळात हा गुन्हा होऊच शकत नाही. शिवाय यात डॉ. सिंग यांना स्वत:ला कोणताही आर्थिक लाभ झाल्याचाही आरोप नाही, असे डॉ. सिंग यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले.ओडिशा सरकारने केलेल्या शिफारशीनुसार तालिबिरा-२ खाणपट्टा न्येवेली लिग्नाईट, महानदी कोल आणि हिंदाल्को यांच्या संयुक्त उपक्रमास देण्याचा निर्णय डॉ. सिंग यांनी घेतला. हा निर्णय पूर्णपणे सार्वजनिक हिताचा व देशाच्या संघराज्य व्यवस्थेस धरूनच होता. कारण या खाणपट्ट्यातील ५०७ टन कोळशापैकी ७५ टक्के हिस्सा न्येवेलीला, १५ टक्के महानदी कोलला व उर्व रित कोळसा हिंदाल्कोला मिळायचा आहे. म्हणजेच ९० टक्के कोळसा सार्वजनिक कंपन्यांना व १० टक्के खासगी उद्योगास मिळेल, असे बिर्ला यांचे जेष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले.