शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. अहमद यांचा राजीनाम्यास नकार

By admin | Updated: July 21, 2014 02:06 IST

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे(एनडीएमए) सदस्य डॉ. मुझफ्फर अहमद यांनी राजीनामा देण्यास नकार देत मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे(एनडीएमए) सदस्य डॉ. मुझफ्फर अहमद यांनी राजीनामा देण्यास नकार देत मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. उपाध्यक्ष डॉ. शशीधर रेड्डी आणि अन्य सात जणांनी महिन्यापूर्वीच राजीनामा दिला असताना डॉ. अहमद पदावर कायम आहेत.के. एम. सिंग, जे. के. सिन्हा, के. एन. श्रीवास्तव, प्रो. हर्ष के. गुप्ता, के. सलीम अली, डॉ. बी. भट्टाचार्जी, मेजर जन. जे. के. बन्सल हे राजीनामे देणारे अन्य सात जण आहेत. मात्र त्यांच्या जागी नव्या नेमणुका झाल्या नाहीत. आपत्ती व्यवस्थापन सांभाळणाऱ्या मंडळावरच त्यामुळे आपत्ती आली आहे. मी या क्षेत्रातील तज्ज्ञ असून योग्य प्रक्रियेद्वारे माझी निवड झाली असताना केवळ सरकार बदलले म्हणून मी राजीनामा देण्याचे काही कारण नाही. माझ्यापासून मुक्ती हवी असेल तर सरकारने मला बडतर्फ करावे. त्यानंतर मी न्यायालयाचे दार ठोठावेन, असा युक्तिवाद डॉ. अहमद यांनी केला आहे. एनडीएमएचे प्रशासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि कृषिमंत्री राधामोहनसिंग यांच्याकडे असून त्यांनाही यावर तोडगा काढणे जमले नाही. डॉ. अहमद यांना बडतर्फ केल्यास चुकीचा संकेत जाईल, असे त्यांना वाटते. सबळ कारणाशिवाय संपुआ सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना हटवू नका, असा आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून एनडीएमएचे कामकाज अधांतरी आहे. मोदी ब्रिक्स परिषदेहून परतल्यानंतर राजनाथसिंग यांनी या मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली किंवा नाही ते कळू शकले नाही. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भूकंप आणि पूरपरिस्थितीचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने हाताळले आहे. ते एनडीएमएचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांनी गुजरातमध्ये व्यवस्थापन सांभाळणारे डॉ. पी. के. मिश्रा यांना अतिरिक्त सचिव बनविले असले तरी त्यांच्याकडे एनडीएमएचे कामकाज सोपविलेले नाही.