शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ तिकीटांमध्ये दुप्पट दरवाढ

By admin | Updated: July 21, 2014 12:54 IST

गेल्या महिन्यात घसघशीत भाडेवाढ करणा-या रेल्वेने आता तात्काळ आरक्षणात लहान अंतरासाठी छुपी दरवाढ केली आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - गेल्या महिन्यात रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४. २ टक्क्यांनी वाढ केली असतानाच आता रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या दरातही छुपी दरवाढ केली आहे. रेल्वेने तात्काळ तिकीटांमध्ये किमान अंतर ३०० किलोमीटरवरुन ५०० किलोमीटरवर नेल्याने लहान अंतरासाठी तात्काळ तिकीट काढणा-या प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहे. 
रेल्वे तोट्यात असल्याने गेल्या महिन्यात नवनियुक्त रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्क्यांची घसघशीत भाडेवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर तात्काळ आरक्षणाच्या दराविषयी असंख्य तक्रारी येत होत्या. अखेर रेल्वेच्या अधिका-यांनी तात्काळ तिकीटांच्या भाडेवाढीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. पूर्वी तात्काळ रिझर्वेशन करताना लहान अंतरासाठी प्रवास करणा-या प्रवाशांना किमान ३०० किलोमीटरपर्यंतच्या अंतराचे पैसे मोजावे लागत होते. आता त्यांना ५०० किलोमीटरनुसार पैसे मोजावे लागतील. 
उदाहरणार्थ एखाद्या प्रवाशाला फक्त २०० किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. पण तात्काळ आरक्षण काढताना त्या प्रवाशाला यापूर्वी ३०० किलोमीटरपर्यंतचे पैसे मोजावे लागत होते. आता मात्र त्या प्रवाशाला तब्बल ५०० किलोमीटरच्या अंतराचे पैसे मोजावे लागतील. यामुळे त्या प्रवाशाच्या तिकीटाच्या दरात तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक दरवाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका प्रामुख्याने लहान अंतरासाठी प्रवास करणा-या प्रवाशांना बसला आहे. रेल्वेने या दरवाढीची अधिकृत घोषणा न केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.