शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

डोन्ट रन अवे, डोन्ट एस्केप; नेटिझन्सची आमिरवर टीका

By admin | Updated: November 25, 2015 00:20 IST

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलताना ‘माझ्या पत्नीला मुलांची काळजी वाटते, तिला देश सोडावासा वाटतो,’ असे विधान करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर टिष्ट्वटर आणि फेसबुकवर नेटिझन्सनी मंगळवारी प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. दिवसभरात एक लाखाहून अधिक टिष्ट्वटस् आणि रिटिष्ट्वटस्मधून आमिरवर टीका करण्यात आली. भारतात जर असहिष्णू वातावरण वाटत असेल तर पळून जाऊ नको. लोकांना जगण्यास आशा वाटेल असे काहीतरी कर, अशा शब्दांत लोकांनी आमिर खानला सल्लेही दिले.आमिर खानच्या वक्तव्याविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी पहिली आघाडी उघडून ‘इन्क्रेडिबल इंडिया’साठी काम करणाऱ्या तुला गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये अचानक ‘इंटॉलरंट इंडिया’ कसा काय वाटू लागला असे विचारले. आजवर याहून कठीण काळाचा सामना तू केलास आणि तेव्हा कधीही हा देश सोडावासा वाटला नाही, हे तू तुझी पत्नी किरणला सांगितलेस का? किरणचा कोणत्या देशात निघून जाण्याचा विचार आहे आणि याच देशाने आमिर खानला घडविले आहे हे तू तिला सांगितलेस का, असा प्रश्नही खेर यांनी त्याला टिष्ट्वटरवरून विचारला.खेर यांच्यापाठोपाठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनीही खरा देशभक्त संकटकाळातही मातृभूमीला सोडून जात नाही, ‘डोंट एस्केप, बिल्ड इट’ अशा शब्दांमध्ये आमिरला सल्ला दिला.‘ज्या वेळेस व्यवस्था योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. त्यापासून पळून जाऊ नका आणि असे करणाराच नायक असतो’, अशा शब्दांमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनी आमिरच्या वक्तव्याचा समाचार घेतला.फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही आमिरच्या या वक्तव्यावर विविध मते दिवसभर उमटत राहिली. आमिरचा नवा सिनेमा लवकरच येत असल्यामुळे त्याने हा वाद ओढवून घेतला असाही सूर काही ठिकाणी लावण्यात आला, तर ‘आमिर आॅन इनटॉलरन्स’ या हॅशटॅगवर सतत टिष्ट्वटस् होत राहिले.(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांचे नुकतेच दहशतवाद्यांशी लढताना निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या पत्नीने मी माझी दोन्ही मुले देशासाठी लष्करातच पाठवेन, असे जाहीर केले. एक वीरपत्नी सौभाग्य गेले तरी आपल्या मुलांना देशसेवेसाठी देईन म्हणते आणि आमिरची पत्नी मात्र मुलांसाठी देश सोडण्याचा विचार करते, अशी तुलना करणारे संदेश दिवसभर टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत राहिले.