शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

एएमयू, जेएमआयचा अल्पसंख्याक दर्जा काढू नका

By admin | Updated: January 23, 2016 03:26 IST

अलिगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा (जेएमआय) अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याचे केंद्र सरकारने

नवी दिल्ली : अलिगड मुस्लिम विद्यापीठ(एएमयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा (जेएमआय) अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याचे केंद्र सरकारने चालविलेले प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांसह आठ पक्षांनी शुक्रवारी एकजुटीचे दर्शन घडविले. या मुद्यावर अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची खरडपट्टी काढत या पक्षांनी सरकारलाही धारेवर धरले आहे.सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे या आठ पक्षांच्या खासदारांनी स्पष्ट केले आहे. संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. केंद्र सरकारने एएमयू आणि जेएमआय या विद्यापीठांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याची घिसाडघाई चालविणे चिंतेची बाब असून आम्ही या प्रयत्नांचा तीव्र निषेध करीत असल्याचे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जेडीयू, राजद, राकाँ, भाकप, माकप आणि ‘आप’च्या खासदारांनी संयुक्त निवेदनात म्हटले. या दोन्ही संस्था अल्पसंख्याक नसल्याचा दावा रोहतगी यांनी केल्याबद्दल या खासदारांनी तीव्र निंदा केली. रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दा मांडताना ‘गंगा जमुनी तेहजीब’ या समृद्ध परंपरेकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केलेली आहे, असेही त्यांनी म्हटले. काय म्हणाले, अ‍ॅटर्नी जनरल...दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया ही अल्पसंख्याक संस्था नाही, कारण तिची निर्मिती संसदेच्या कायद्यानुसार झाली आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाला विधेयकात कधीही अल्पसंख्याक संस्था संबोधले नाही, असे अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे अभिप्राय पाठविताना १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखलाही दिला होता. एएमयू ही तांत्रिकदृष्ट्या अल्पसंख्याक संस्था ठरत नाही, असे या न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते, तेच सूत्र जेएमआयला लागू होते, असे रोहतगी यांनी म्हटले. सरकारने मांडलेली बाजू!रोहतगी यांनी साधारणपणे आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडली. भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने एएमयूला अल्पसंख्याक संस्था मानले जाऊ शकत नाही. ही संस्था अल्पसंख्याक नाहीच, असे सरकारला वाटत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मानव संसाधन मंत्रालयाने या दोन विद्यापीठांच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत कायदा मंत्रालयाला मत मागितल्यानंतर कायदा मंत्रालयाने रोहतगी यांचा सल्ला घेतला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)