दादांचा कारखाना बुडू देऊ नका बी. जे. खताळ : जयंतीनिमित्त ठिकठिकाणी आदरांजली
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
राहुरी : डॉ़ बाबूराव दादा तनपुरे यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर सहकारी संस्था उभ्या करून सामान्य माणसांना आधार दिला़ राहुरी कारखान्याला दिलेले दादांचे नाव बुडवू नका, वर्गणी करा, पण कारखाना पुढील वर्षी चालू ठेवा, असा वडीलकीचा सल्ला माजी मंत्री बी़ जे़ खताळ पाटील यांनी दिला़
दादांचा कारखाना बुडू देऊ नका बी. जे. खताळ : जयंतीनिमित्त ठिकठिकाणी आदरांजली
राहुरी : डॉ़ बाबूराव दादा तनपुरे यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर सहकारी संस्था उभ्या करून सामान्य माणसांना आधार दिला़ राहुरी कारखान्याला दिलेले दादांचे नाव बुडवू नका, वर्गणी करा, पण कारखाना पुढील वर्षी चालू ठेवा, असा वडीलकीचा सल्ला माजी मंत्री बी़ जे़ खताळ पाटील यांनी दिला़९६ वर्षीय खताळ पाटील यांनी तरूणांना लाजवील असे भाषण करून उपस्थितांना थक्क केले़ बाबूराव तनपुरे यांच्या जयंतीनिमित्त राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात खताळ बोलत होते. संस्थांना नेत्यांचे नाव देणे हे मुळात चुकीचे आहे़ लोणीवरून नाव ठेवण्याची परंपरा सुरू झाली़ राहुरी कारखान्याने एके काळी राज्यात आदर्श निर्माण केला याचा विसर पडू देवू नका़ सर्वजण एकत्र आले तर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकतो, असा अशावाद खताळ यांनी व्यक्त केला़यावेळी तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे, दत्तात्रय अडसुरे, गंगाधर जाधव यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास सभापती अरूण तनपुरे, रावसाहेब खेवरे, सुरेश बाफना, खंडूभाऊ डुक्रे, रावसाहेब शिरसाट आदी उपस्थित होते़ आभार दत्ता कवाणे यांनी मानले़याव्यतिरिक्त ठिकठिकाणी तनपुरेंना आदरांजली वाहण्यात आली. वांबोरी येथील प्रसाद शुगरमध्ये सरव्यवस्थापक अशोक सातपुते यांनी डॉ़ दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदारांजली अर्पण केली़ राहुरी कॉलेजमध्ये प्राचार्य अशोक शिंदे यांचे भाषण झाले़ यावेळी उपाध्यक्ष सुरेश वाबळे, प्राचार्य संभाजी पठारे उपस्थित होते़आभार सूर्यकांत गडकरी यांनी मानले़ राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होम, श्री लक्ष्मीनारायण आयटीआय, छत्रपती इंजिनिअरींग कॉलेज, श्री शिवाजी प्रसारक मंडळाच्या शाळा, तनपुरे शिक्षण संस्थांच्या शाळा व विविध संस्थामध्ये तनपुरे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फोटो कॅप्शऩडॉ. बाबूराव तनपुरे जयंतीनिमित्त राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री बी़ जे़ खताऴ