शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहात पंतप्रधानांविरोधात घोषणा देऊ नका - सोनिया गांधींची सूचना

By admin | Updated: December 24, 2015 10:52 IST

संसदेत सरकारविरुद्ध आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात घोषणा देऊ नका, असे निर्देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खासदारांना दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेत सरकारविरुद्ध आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात घोषणा देऊ नका, असे निर्देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खासदारांना दिले. इतके दिवस काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी मोदींवर टीका केलेलीअसताना व सरकारविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व खुद्द सोनिया गांधी यांनीच केलेले असताना, त्यांनी आता अचानक केलेल्या या सूचनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत आगमन झाले. त्यावेळी काँग्रेस नेते लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर डीडीसीएच्या मुद्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरुद्ध घोषणा देत होते. त्यात बंगालचे खासदार अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणा दिली असता सोनिया गांधी यांनी त्यांना इशा-यानेच मोदींविरोधात घोषणा न देण्यास बजावले. त्यानंतर चौधरी यांनी तत्काळ मोदींचे नाव घेणे थांबवले. 
त्यामुळे संपूर्ण हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील घोषणांमध्ये अखेरच्या दिवशी तरी खंड पडला. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सभागृहातून निघून गेले. 
देशातील सर्वोच्च पदावरील नेत्याचा अपमान केल्याबद्दल टीका होऊ नये म्हणूनच ही सावध भूमिका घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.