मुंबई। दि. ३१ (प्रतिनिधी) ............................................जान्हवीला जामीन देऊ नकाआरसीएफ पोलिसांकडून न्यायालयात प्रत्युत्तरमुंबई - पूर्व मुक्त मार्गावर(इस्टर्न फ्री वे) दारूच्या नशेत अपघात करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरच्या जामीन अर्जाला आरसीएफ पोलिसांनी विरोध केला आहे. तिच्याकडून घडलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. शिवाय हा तिचा पहिलाच अपघात नाही., त्यामुळे जामीन दिल्यास तिच्याकडून अशा गुन्हयांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे प्रत्युत्तर सरकारी वकील ॲड. इक्बाल सोलकर यांनी सत्र न्यायालयात सादर केले. त्यावर दोन्ही बाजूचे वकील उद्या युक्तिवाद करतील. ९ जुलैच्या मध्यरात्री जान्हवीने दारूच्या नशेत फ्री-वेवर उलटया दिशेने भरधाव ऑडी चालवून एका टॅक्सीला धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले होते. याआधी दंडाधिकारी न्यायालयाने दोनवेळा जान्हवीचे जामीन अर्ज फेटाळले होते.
जान्हवीला जामीन देऊ नका
By admin | Updated: August 4, 2015 22:22 IST