शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या वाढदिवसाला व्हॉट्स अ‍ॅपवरुन घेतला तलाक

By admin | Updated: April 24, 2017 17:47 IST

गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर वातावरण पेटले असताना हैदराबादमध्ये असेच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 24 - गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर वातावरण पेटले असताना हैदराबादमध्ये असेच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील सुमायना नामक महिलेला तिच्या पतीने दुबईवरून व्हॉट्स अ‍ॅवर तलाक घेतला आहे. विशेष म्हणजे हा तलाक तिला तिच्या वाढदिवसादिवशी पाठवला आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याने हा तुझा बर्थडे गिफ्ट समज असेही म्हटले आहे. 
सुमायनाचे 2015 मध्ये ओवेस तालिबशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. तेंव्हापासून दोघामध्ये वाद सुरु झाला होता. त्यानंतर दोघेही वेगळे राहत होते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ओवेसने व्हॉट्स अ‍ॅपवरुन तलाक घेतला होता. सध्या ट्रिपल तलाकचे वातावरण गरम असल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. हैदराबद येथील सनथनगर पोलिस स्थानकात सुमायना नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुमायनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ओवेस तालिब विरोधात 420, 406, 506 १/६ 34 गुन्ह्याची नोंद केली आहे.  सुमायनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सासू-सासरे आपल्यावर काळी जादू करत होते. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा करत होते. व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाकचा मॅसेज आल्यानंतर आपल्या वडिलांनी माहेरी आणल्याचे तिने सांगितले.
 
मॅसेजमध्ये सुमायनाच्या पतीने लिहिले, तलाक, तलाक, तलाक. हा माझा अंतिम निर्णय आहे. कुणाला घेऊन येतेस आण... कुणाला सांगणार ते सांग... कुणाचा बापही माझे काही वाईट करू शकणार नाही. तुला हेच हवे होते ना... घे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट...