शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

१०१ जि.प.शाळा अ श्रेणीत जि.प. शिक्षण समितीची सभा : १८४९ प्राथमिक शाळांना जलशुद्धीकरण यंत्र देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: March 23, 2016 00:09 IST

जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात आली.

जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात आली.
सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ही सभा झाली. सदस्य लीलाबाई सोनववणे, जयश्री महाजन, प्रतिभा राणे, समाधान पाटील, छाया महाले, पूनम पाटील, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित होते.
ग्रंथालय समृद्धी योजना
जि.प.च्या शाळांमध्ये ग्रंथांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येक शिक्षकाने दर महिन्याला एक पुस्तक खरेदी करून ते वाचावे व नंतर आपल्या शाळेच्या ग्रंथालयास भेट द्यावे. ही योजना ऐच्छिक असेल. शिक्षकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
२३७ शाळा डिजीटल
जिल्हाभरात २३७ शाळा डिजीटल झाल्या असून, ५३ शाळा आयएसओ झाल्या आहेत. आयएसओ शाळांची संख्या आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

परीक्षेचेे वेळापत्रक नाही, नर्सरी प्रवेशाबाबत नोंदणी सुरू
अद्याप जि.प.च्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेण्याबाबतचे परिपत्रक किंवा सूचना वरिष्ठांकडून आलेल्या नाहीत. १० दिवस आगोदर परीक्षा घेण्याचे नियोजन अजून नाही. पण ३ ते ६ एप्रिल दरम्यान चाचणी परीक्षा घेण्याचे आदेश आहेत. तसेच खाजगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार नर्सरी व पहिलीच्या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये नोंदणी करायची आहे. या तारखेनंतर ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होईल. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या पाल्यांना या योजनेतून प्रवेश मिळेल, असेही सांगण्यात आले.

आरोग्य केंद्रांमध्ये दोन शवपेट्या मिळणार
७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन शवपेट्या प्राप्त व्हाव्यात, असा प्रस्ताव शासनाला पाठविल्याची माहिती आरोग्य समितीच्या सभेत अधिकार्‍यांनी दिली. मंगळवारी दुपारी सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सदस्य डॉ.प्रवीण पाटील, कोकीळा पाटील, सुशीला तावडे, वैशाली पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. ३०३ आरोग्य उपकेंद्रांना कुंपण भींत व ५७ आरोग्य केंद्रांमध्ये पेव्हर, हायमास्ट आणि काँक्रीटीकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. तसेच जि.प.च्या शाळांसह ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४५० उपकेंद्रांना पुढील महिन्यापासून घरगुती दरानुसार वीज बिले येतील, असेही सभेत सांगण्यात आले.