शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची सदस्यसंख्या वाढणार लोकसंख्या वाढीनुसार नवी रचना : आगामी निवडणुकीत जळगाव तालुक्यात असतील सहा गट

By admin | Updated: March 30, 2016 22:21 IST

जळगाव- जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. लोकसंख्या वाढ झालेली असल्याने जि.प.चे गट व पं.स.चे गणही वाढतील. अर्थातच जि.प. व पं.स.च्या सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. जळगाव तालुक्यात एक जि.प. गट वाढून एकूण सहा गट असतील, अशी माहिती आहे.

जळगाव- जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. लोकसंख्या वाढ झालेली असल्याने जि.प.चे गट व पं.स.चे गणही वाढतील. अर्थातच जि.प. व पं.स.च्या सदस्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. जळगाव तालुक्यात एक जि.प. गट वाढून एकूण सहा गट असतील, अशी माहिती आहे.
जि.प.तील गटांची माहिती, सदस्यसंख्या आदी मुद्दे निवडणूक शाखेने नुकतेच मागीतले आहेत. या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला आहे. परंतु जि.प.ची सदस्यसंख्या नेमकी किती वाढेल हे अजून जि.प.च्या प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. निवडणूक विभागातर्फे यासंबंधी सर्व कार्यवाही होणार आहे.

जि.प.चे सध्या ६८ सदस्य आहेत. या सदस्यसंख्येत पुढील पंचवार्षिकमध्ये निश्चित वाढ होईल हे मात्र स्पष्ट झाले आहे. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी जि.प.त नूतन पदाधिकार्‍यांची निवड करावी लागणार आहे.

गट पुनर्रचनेच्या शक्यतेने सदस्यही संभ्रमात
२०११ च्या जनगणनेनुसार जि.प.ची आगामी निवढणूक होणार असल्याने बहुसंख्य जि.प. गटांची पुनर्रचना होऊ शकते. यामुळे आपल्या सध्याच्या गटात किती गावे असतील, किती मतदार असतील, कुठली गावे वगळली जातील यासंबंधी सदस्यांमध्ये चर्चा आहेे. यामुळे पुढील निवडणुकीत काय आखाडे बांधावेत यासंबंधी सदस्यांमध्येही संभ्रम, अनिश्चितता आहे.

३२ हजार मतदारांचा एक गट
जि.प.च्या एका गटात ३२ मतदारांचा एक गट असेल, असे जि.प.तून सांगण्यात आले. ज्या मतदारसंघात सध्या यापेक्षा अधिक मतदार आहेत त्या गटांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे.

जळगावात शिरसोली-चिंचोली सर्वात मोठा गट
जळगाव तालुक्यात शिरसोली चिंचोली सर्वात मोठा गट आहे. या गटात ४५ हजार मतदार आहेत. तर आसोदा-ममुराबाद हा सर्वात लहान गट असून, त्यात ३३ हजार मतदार आहेत. याचा अर्थ शिरसोली गटाची पुनर्रचना होईल. नशिराबाद -भादली गटातील काही गावे व शिरसोली चिंचोली गटातील काही गावे मिळून नवीन गट निर्माण होऊ शकतो. सध्या जळगाव तालुक्यात पाच जि.प.सदस्य म्हणजेच जि.प.चे पाच गट आहेत. त्यात शिरसोली -चिंचोली, म्हसावद-बोरनार, नशिराबाद-भादली, आसोदा-ममुराबाद, कानळदा-भोकर या गटांचा समावेश आहे. तर १० पं.स.चे सदस्य आहेत. नवीन एक गट व दोन पं.स.चे गण तयार झाल्यास सहा जि.प.सदस्य असतील तसेच पं.स.चे १२ सदस्य राहतील.