शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

आयुक्तांच्या निवासस्थानासाठी जागेवर शिक्कामोर्तब जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी; साफसफाईला सुरुवात

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्‍यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर निवासस्थान उभारण्याला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली. मनपाने या जागेवर साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.

अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्‍यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर निवासस्थान उभारण्याला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली. मनपाने या जागेवर साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना राहण्यासाठी खदान पोलीस ठाण्यासमोर इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत चिंचोळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या या इमारतीमध्ये शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्यासह प्रभारी लेखाधिकारी अरुण पाचपोर, विधी विभागप्रमुख श्याम ठाकूर यांचा निवास आहे. १ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या स्थापनेला चौदा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला; परंतु या चौदा वर्षांच्या कालावधीत मनपा आयुक्तांना निवास करण्यासाठी अद्यापही हक्काची जागा उपलब्ध नसल्याचे दुर्दैव आहे. परिणामी तत्कालीन आयुक्त डॉ.विपीनकुमार शर्मा, दीपक चौधरी, डॉ.महेंद्र कल्याणकर, अजय लहाने यांना भाडेतत्त्वावर बंगला घेऊन राहण्याची वेळ आली. या बदल्यात संबंधित मालमत्ताधारकाला महिन्याकाठी भाडे द्यावे लागते. ही खर्चिक बाब लक्षात घेता, आयुक्तांना हक्काची जागा उपलब्ध असावी, या उद्देशातून आयुक्त अजय लहाने यांना जिल्हाधिकार्‍यांनी जागा शोधण्याचे निर्देश दिले. मनपा प्रशासनाने जागेसाठी बरीच शोधाशोध केली. जागेसंदर्भात आयुक्त लहाने जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा करीत असताना उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनीदेखील काही जागा सुचवल्या. यामध्ये रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला शासकीय जागेला पसंती दर्शविण्यात आली.

बॉक्स...
सकाळी झाले शिक्कामोर्तब
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सकाळी १० वाजता संबंधित जागेची पाहणी केली. सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी महापौर उज्ज्वला देशमुख यांनीदेखील या जागेची पाहणी केली.

कोट...
आयुक्त पदावरील अधिकार्‍यांना निवासस्थान नसल्यामुळे भाडेतत्त्वावर इमारत घ्यावी लागते. याबदल्यात संबंधित मालमत्ताधारकाला वर्षाकाठी ३ लाख रुपये भाडे द्यावे लागते. आजपर्यंत दिलेल्या भाड्याच्या रकमेत मनपाच्या हक्काच्या वास्तूचे निर्माण झाले असते.
-अजय लहाने, आयुक्त मनपा