शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

युनियन पदाधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई

By admin | Updated: May 8, 2014 21:22 IST

सातपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस व उपाध्यक्ष यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाने गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत कंपनी सेवेतून बडतर्फ केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सातपूर : येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस व उपाध्यक्ष यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाने गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत कंपनी सेवेतून बडतर्फ केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र ॲण्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांच्यावर १२ मे २०१३ रोजी दोषारोप पत्र बजावले होते. दरम्यानच्या काळात ठेवण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती २५ एप्रिल रोजी या दोघा पदाधिकार्‍यांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आज महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी व्यवस्थापनाने या दोघा पदाधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. कंपनी व्यवस्थापनाने या दोघांना बडतर्फीचे पत्र दिले असता पत्र घेण्यास दोघांनी नकार दिला आहे. त्यामुळे बडतर्फीचे पत्र पोस्टाद्वारे त्यांच्या घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. विद्यमान युनियन पदाधिकार्‍यांवर कंपनी व्यवस्थापनाने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
युनियन पदाधिकार्‍यांची चौकशी सुरू असताना कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर यांच्याबरोबर बैठक घेऊन कठोर भूमिका घेऊ नये. एकदम तडकाफडकी बडतर्फीचा निर्णय न घेता दोन-तीन दिवस निलंबित करावे, अशी विनंती व्यवस्थापनास करण्यात आली होती. आता व्यवस्थापनाने बडतर्फीचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्‍यांची भेट घेऊन बडतर्फीचा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष शिरीष भावसार यांनी दिली.