शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बरखास्त करा -काँग्रेस

By admin | Updated: December 3, 2014 01:29 IST

छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली.

नवी दिल्ली : छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली. काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी, राज्यातील स्थानिक प्रशासन कोलमडल्याचे सांगून गेल्या काही वर्षात अनेक जवान ठार झाल्याची माहिती दिली.गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतरही राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सांगितले. गेल्या काही वर्षात येथे २५०० नागरिक ठार झाल्याचा आकडा दिला जात असून तो प्रत्यक्षात १० हजाराहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.येथे कुठलेच प्रशासन नाही, कुठलीच गुप्तचर यंत्रणा कार्यरत नाही, अशा स्थितीत या राज्यातील सरकार तात्काळ बरखास्त केले जावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हा पक्षाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे उत्तर त्यांना संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिले. गृहमंत्री राजनाथसिह हे घटनास्थळाला मंगळवारी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)