शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

इसिसला थोपविण्यासाठी डावपेचांवर चर्चा

By admin | Updated: January 17, 2016 01:38 IST

पश्चिम आशियात सक्रिय इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडियावरील प्रचारास भारतीय नागरिक बळी पडत असल्याच्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सक्रिय इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडियावरील प्रचारास भारतीय नागरिक बळी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणेला अतिसतर्क राहण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.या बैठकीला गृहमंत्रालय, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इसिसद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमाने भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर बैठकीत विचारविनिमय झाला. तसेच शेजारील देशात या संघटनेच्या वाढत्या प्रभावापासून भारतीय तरुणांचा बचाव करण्याकरिता सुरक्षा संस्थांनी नवे डावपेच आखले पाहिजे अशी गरज व्यक्त करण्यात आली. त्याअनुषंगाने अल्पसंख्यक समुदायातील लोकांच्या विकासासाठी चांगल्या योजना, त्यांना इसिसच्या प्रभावातून वाचविण्याकरिता ठोस उपाय आणि पोलीस विभागाला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक कार्यक्षम बनविण्याबाबतच्या सूचना समोर आल्या. राजनाथसिंह यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय परंपरा आणि कौटुंबिक संस्काराच्या आधारे या धोक्याचा सामना केला जाऊ शकतो. शेजारील देशांच्या तुलनेत भारतात इसिसचा अत्यल्प अथवा नाहीच्या बरोबरीत प्रभाव आहे. परंतु तरीही चौफेर सतर्क राहण्याची गरज आहे. भारतातील बहुतांश मुस्लीम संघटनांनी इसिस आणि तिच्या दहशतवादी विचारसरणीला विरोध केला आहे याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला महाराष्ट्रासह विविध राज्यांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते. (वृत्तसंस्था)