सपकाळमध्ये व्यक्तिमत्त्व विकासावर चर्चासत्र
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के. आर. सपकाळ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन या विषयावर तीन दिवसांचे चर्चासत्र उत्साहात पार पडले.
सपकाळमध्ये व्यक्तिमत्त्व विकासावर चर्चासत्र
नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के. आर. सपकाळ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन या विषयावर तीन दिवसांचे चर्चासत्र उत्साहात पार पडले.कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एम. डी. सारस्वत, संचालक डॉ. एस. बी. धांडे, प्राचार्य डॉ. व्ही. जे. गोंड, डॉ. आर. बी. सौदागर, ओक, रायते, पाटील, बच्छाव आदि उपस्थित होते.सदर चर्चासत्रात विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर आजच्या आधुनिक युगात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून खास चर्चासत्रासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर द्वारे ऑनलाइन सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी, आवश्यक असणारे कौशल्य यांची देखील माहिती विविध मान्यवरांनी आपल्या व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यशाळेस जिल्हा भरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी म्हणाले की, सदर चर्चासत्र हे आमच्या आयुष्याला एक आवश्यक दिशा देण्यासाठी फार उपयुक्त ठरलेआहे.फोटो ओळीकार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्ही. पी. ओक.