शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवर चर्चा

By admin | Updated: January 4, 2016 02:56 IST

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत झालेल्या पठाणकोट अतिरेकी हल्ल्याने खळबळ माजली असतानाच,

नवी दिल्ली : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत झालेल्या पठाणकोट अतिरेकी हल्ल्याने खळबळ माजली असतानाच, रविवारी सरकारने पाकिस्तानात काम केलेले माजी मुत्सद्दी व माजी विदेशी सचिवांना पाचारण करीत, शेजारी देशाबाबतच्या रणनीतीवर चर्चा केली. तथापि या ‘असामान्य’ बैठकीबाबत कुठलीही माहिती देणे परराष्ट्र मंत्रालयाने टाळले. ही बैठक म्हणजे केवळ पाकिस्तानबाबतच्या रणनीतीवरील कूटनैतिक चर्चा होती, केवळ एवढेच परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. एस.के. लांबा, जी. पार्थसारथी, श्याम सरण, शिवशंकर मेनन, सत्यब्रत पॉल, शरद सभरवाल आणि टीसीए राघवन या बैठकीत उपस्थित होते. पठाणकोट अतिरेकी हल्ल्याचा भारत-पाक चर्चेवरील संभाव्य परिणामांवरून चर्चा सुरू झाली असतानाच ही बैठक पार पडली, हे विश्ोष.सूत्रांच्या मते, नवाज शरीफ सरकार या हल्ल्याच्या तपासात भारतीय तपास संस्थांना किती सहकार्य करते, यावर भविष्यातील भारताची रणनीती अवलंबून आहे.अमेरिकेकडून निंदावॉशिंग्टन : पाकी अतिरेक्यांनी केलेल्या पठाणकोट हल्ल्याची अमेरिकेने रविवारी तीव्र शब्दांत निंदा केली. अतिरेकी नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहनही अमेरिकेने केले. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची अमेरिका निंदा करते. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत सरकारला सहकार्य करण्यास अमेरिका कटिबद्ध आहे. अतिरेकी नेटवर्कचा खात्मा करण्यासाठी या क्षेत्रातील सर्व देशांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन अमेरिका करते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले.