शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धोनी झाला ३५ वर्षांचा!, दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव

By admin | Updated: July 7, 2016 19:39 IST

धोनीला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७  : टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुवारी ३५ वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्त दिग्गजांसह चाहत्यांनी माहीचे अभिष्टचिंतन केले. धोनीला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.

ठाकूर आणि सचिन यांनी टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या तर सेहवागने दिलेल्या शुभेच्छा संदेशात माहीच्या हेलिकॉप्टर शॉटचे स्मरण करीत ७ जुलै यापुढे राष्ट्रीय हेलिकॉप्टर डे घोषित करण्याची मागणी केली. आयसीसीने टिष्ट्वटर हॅन्डलवर सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीचे कौतुक केले. बच्चन यांनी ह्यहॅप्पी बर्थ डे एमएस!ह्ण असे संबोधले.

भारतीय वरिष्ठ तसेच अ संघातील अनेक खेळाडूंनी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश रैनाने आपल्या कर्णधाराला व्हिडिओ शेअर केला. त्यात माही बासरी वाजविताना दिसत आहे. येणाऱ्या अनेक वर्षांत तुझी चमक कायम राहील, अशा शुभेच्छा दिल्या. आयसीसीच्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी-२०विश्वचषक, २०११ मध्ये वन डे विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारतीय संघ कसोटीत नंबर वन बनला तो धोनीच्याच नेतृत्वात.

धोनीने आतापर्यंत २७८ वन डेमध्ये ८,९१८ धावा केल्या. त्यात नऊ शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. तो कसोटीतून निवृत्त झाला. माहीने ९० कसोटीत ४,८७६ धावा केल्या असून, त्यात सहा शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्याच्या नावावर २५६ झेल आणि ३८ स्टम्पिंग आहेत.