शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वनविभागामुळे रखडला विदर्भाचा विकास

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

शोभा फडणवीस : जनमंचतर्फे व्याख्यानाचे आयोजन

शोभा फडणवीस : जनमंचतर्फे व्याख्यानाचे आयोजन
नागपूर : इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता. मात्र १९८० मध्ये नवीन वनकायदा आला, तेव्हा वनांवरील लोकांचा अधिकार काढून घेण्यात आला. १०० टक्के जंगल हे वनविभागाच्या अखत्यारीत आले. वनखात्यामुळे विदर्भातील ९० टक्के सिंचनाचे प्रकल्प रखडले. सर्वाधिक खनिज संपदा असतानाही एकही उद्योग निर्माण होऊ शकला नाही. विदर्भाच्या मागासलेपणाला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार शोभाताई फडणवीस यांनी केला.
जनमंचतर्फे आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात वेगळा विदर्भ कशासाठी? या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्ता म्हणून शोभाताई फडणवीस बोलत होत्या. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष ॲड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, महासचिव राजीव जगताप उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शोभाताई फडणवीस यांनी विदर्भाच्या क्षमतेची माहिती दिली. विदर्भावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भाची आवश्यकता पटवून दिली. राज्याच्या पर्यावरणाचा समतोल केवळ १९.९ टक्के जंगलावर आधारित आहे. हे जंगल केवळ विदर्भात आहे. १९८० मध्ये नवीन वनकायदा झाला तेव्हा राज्यात ३१ टक्के जंगल होते. २०१२-१३ मध्ये केवळ २०.२० टक्के जंगल राहिले. २०१३-१४ मध्ये जंगलाचे क्षेत्र १९.९ टक्क्यांवर आले. पुण्यातील लवासा सिटीसाठी अजित पवारांनी विना परवानगीने २० किलोमीटरचे जंगल कापले. विदर्भात जंगलामुळे अडलेल्या प्रकल्पासाठी एक इंचही जंगल कापू दिले नाही. जंगलामुळे विदर्भातील ११ सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळू शकली नाही. ऐतिहासिक मालगुजारी तलावाचा वापर जंगलामुळे होऊ शकला नाही.
त्यामुळे विदभाचे कृषी क्षेत्र अविकसित राहिले. विदर्भात १३ टक्के ओलित व ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे विदर्भाला आत्महत्येचा क लंक लागला आहे. गोदावरी तंटा लवादाने विदर्भाच्या वाट्याला हजारो अब्ज घनफूट पाणी उपलब्ध केले. वनविभागामुळे यातून एक थेंबही पाणी विदर्भाला मिळाले नाही. प्रदूषणाचे भूत विदर्भाच्या डोक्यावर आहे. हे सर्व मुद्दे विदर्भाच्या विकासाला मारक ठरले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अनिल किलोर यांनी केले. संचालन राम आकरे व आभार राजीव जगताप यांनी मानले.