शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बनवाबनवी करणार्‍या शालक-मेहुण्यास पोलीस कोठडी दोघांची सखोल चौकशी : केसरसिंगने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये भरतीसाठी केला आहे अर्ज

By admin | Updated: March 30, 2016 22:20 IST

जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्‍या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती समोर आली. या दोघांना असे गैरकृत्य करण्याबाबत कोणी पूर्वकल्पना दिली, या प्रकारात एखादा अधिकारी सहभागी आहे का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्‍या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती समोर आली. या दोघांना असे गैरकृत्य करण्याबाबत कोणी पूर्वकल्पना दिली, या प्रकारात एखादा अधिकारी सहभागी आहे का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
संशयित आरोपी रामचंद्र कपूरचंद भवरे (२९, रा.जोडवाडी कचनेर, ता.औरंगाबाद) व केसरसिंग इंदरसिंग घुशिंगे (१९, रा.जोडवाडी, ता.औरंगाबाद) या दोघांना बुधवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले. आरोपींनी अजून कोणत्या ठिकाणी भरतीसाठी अर्ज केले आहेत, आरोपींना गैरप्रकार करण्यास कोणी मदत केली, दोघांच्या घरी जाऊन त्यांचे कागदपत्रे जप्त करायचे आहेत, म्हणून त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी हेमंत मेंडकी यांनी आपल्या युक्तिवादात केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दुसर्‍या दिवशी कसून तपासणी
भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तोतया उमेदवार सापडल्याने दुसर्‍या दिवशी उमेदवारांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. मैदानातील प्रत्येक टेबलवर कर्तव्यावर असणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षकांकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.