तळोजात प्रदूषण रोखण्याची मागणी
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
पनवेल : पनवेल तालुक्यातील तळोजे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने रासायनमिश्रीत पाणी रात्रीच्यावेळी छुप्या मार्गाने नदीच्या पात्रात टँकरद्वारे सोडत आहेत. यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नुकतीच शहरामधील नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नवी मुंबईचे अधीक्षक तानाजी यादव यांची भेट घेतली.
तळोजात प्रदूषण रोखण्याची मागणी
पनवेल : पनवेल तालुक्यातील तळोजे औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने रासायनमिश्रीत पाणी रात्रीच्यावेळी छुप्या मार्गाने नदीच्या पात्रात टँकरद्वारे सोडत आहेत. यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नुकतीच शहरामधील नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नवी मुंबईचे अधीक्षक तानाजी यादव यांची भेट घेतली.तळोजा औद्योगिक वसाहतीत सुमारे २५ गावांचा समावेश आहे. विशेषत: संध्याकाळच्या वेळेला परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त वायू पसरल्याने नागरिकांना मोठा त्रास होतो. यामुळे याठिकाणच्या अनेक नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार जडले आहेत. तसेच अनेक कंपनीमधून बाहेर पडणारे दूषित पाणी सर्रास याठिकाणच्या नदीत सोडले जाते. त्यामुळे वनस्पती व जलचरांना देखील धोका निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, अशी विचारणा यादव यांच्याकडे करण्यात आली. यादव यांनी यावेळी तळोजे औद्योगिक वसाहतीत प्रदूषण मोजणारी आणि अटकाव घालणारी शास्त्रोक्त यंत्रणा बसविण्यात आल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)