शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

धर्मातर मुद्दय़ावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी

By admin | Updated: December 12, 2014 02:54 IST

आग:यातील कथित धर्मातराच्या मुद्दय़ावर गुरुवारी सलग दुस:या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी सरकारला घेरत जोरदार गोंधळ घातला़

विरोधकांची सडकून टीका : भाजपाला कायदा हवा
नवी दिल्ली : आग:यातील कथित धर्मातराच्या मुद्दय़ावर गुरुवारी सलग दुस:या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी सरकारला घेरत जोरदार गोंधळ घातला़ कामकाज बाजूला ठेवून सरकारने या मुद्दय़ावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली़ 
चर्चेची तयारी दाखवितानाच सहमती झाल्यास धर्मातरविरोधी कायदा आणण्यास आम्ही राजी असल्याचेही सरकारने या वेळी स्पष्ट केल़े सरकारच्या या हेतूला काँग्रेसने कडाडून विरोध केला; शिवाय या मुद्दय़ावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, या आग्रहावर विरोधक ठाम राहिले. देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप, राज्यघटनेअंतर्गत देशाने अंगीकारलेली लोकशाही, ऐक्य, बंधुता व सर्वधर्म समभाव या मूल्यांवर भर देत कथित धर्मातराच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची व सभागृहात एक प्रस्ताव आणण्याची मागणी लोकसभेत गुरुवारी विरोधकांनी केली़ तर भाजपाने धर्मातरविरोधी कायदा आणण्याची गरज व्यक्त केली़ लोकसभेत प्रश्नोत्तरे आणि शून्य तासादरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, सपा, राजद या सर्व पक्षांनी एकजूट होत, धर्मातराच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली़ अध्यक्षांनी ती मान्य केल्यानंतर आग:यातील कथित धर्मातराच्या मुद्यावर  काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेची सुरुवात केली़ राज्यघटना देशाचा आत्मा आहे आणि राज्यघटनेने सर्व लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत धर्म स्वातंत्र्य बहाल केले आह़े अशास्थितीत आग:यात कथितरीत्या बळजबरीने धर्मातराची घटना समोर आली आह़े हे देशात कटुता निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत़़ पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्याव़े कारण पंतप्रधान सर्वाचे आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस, बीजू जनता दल, माकपा आदी पक्षांनी सर्वधर्म समभावाची भावना बळकट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्यावर जोर दिला़ ‘घर वापसी’च्या नावावर आग:यातील कथित धर्मातराची घटना दुर्दैवी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या सौगत राय यांनी केली. सपाने मात्र आग:यातील घटनेवर इथे एवढा गोंधळ का? असा सवाल केला़ आग:यात या घटनेवर कुठलाही गोंधळ नाही़ मग इथे या मुद्यावर इतका गदारोळ का? असे सपाप्रमुख मुलायमसिंह यादव म्हणाल़े बळजबरीने धर्मातर करणो हा गुन्हा असल्याचे सांगत, यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी माकपाने केली़
 
भाजपाचे सुमेधानंद सरस्वती यांनी चर्चेत भाग घेताना संबंधित मुद्यावर चर्चेची कुठलीही गरज नव्हती, असे मत मांडल़े विरोधकांनी एका सामान्य घटनेचा बाऊ केला़ भाजपा धर्मातराच्या बाजूने नाही़ ज्या राज्यात भाजपाचे सरकार आले तेथे त्यांनी धर्मातरविरोधी कायदे आणण्यासाठी पावले उचलली़ या विषयावर कायदा बनावा, असे ते म्हणाल़े
 
आग:याच्या देवरी मार्गावरील देवनगर येथे गत सोमवारी कथितरीत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा धर्म जागरण समन्वय विभाग आणि बजरंग दलाच्या कार्यकत्र्यानी धर्मातर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आरोप आह़े पहिल्या दिवशी आम्ही स्वेच्छेने धर्मातर केल्याचा दावा संबंधित लोकांनी केला होता़ मात्र दुस:याच दिवशी आमची दिशाभूल करून धर्मातर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होत़े
 
सहमती झाल्यास कायदा आणू- नायडू
आग:यातील कथित धर्मातराचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला असतानाच, सर्व पक्ष राजी झाल्यास धर्मातरविरोधी कायदा आणण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कमकाजमंत्री वेंकय्या नायडू गुरुवारी म्हणाल़े लोकसभेबाहरे   पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला़
 
कारवाईचे निर्देश जारी- आगरा आणि अलिगड येथे कथितरित्या धर्मातर कार्यक्रमाचे आयोजन करणा:यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे.शिवाय उत्तरप्रदेश अल्पसंख्यक आयोगाने याप्रकरणी आग:याचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांकडून अहवाल मागितला आह़े
 
धर्मांतरावर प्रतिबंध हे मूलभूत 
अधिकारांवरील अतिक्रमण-काँग्रेस
सर्व राजकीय पक्षांनी सहमती दर्शवल्यास धर्मातरविरोधी कायदा आणण्याच्या सरकारच्या सल्लावर काँग्रेसने गुरुवारी कठोर टीका केली़ धर्मातर प्रतिबंध हे मूलभूत अधिकारावरील अतिक्रमण ठरेल, असे काँग्रेस नेते दिग्विजयसिंग म्हणाल़े  आमिषे देऊन वा बळजबरीने धर्मातर करणो हा एक गुन्हा आहे आणि ही तरतूद अशीच राहायला हवी़ पण एखादी व्यक्ति स्वेच्छेने दुस:या धर्मात जाऊ इच्छित असेल तर अशास्थितीत धर्मातरावरील बंदी अयोग्य ठरेल़ स्वेच्छेने धर्मातर करू इच्छिणा:यास व्यंकैय्या नायडू रोखू शकतात का? असा सवाल त्यांनी केला़