शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला शुद्ध पाण्यासाठी वणवण मिनरल वॉटर जारला वाढली मागणी

By admin | Updated: April 24, 2016 00:39 IST

नशिराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. दरम्यान मिनरल वॉटर, जार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

नशिराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. दरम्यान मिनरल वॉटर, जार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
वर्षानुर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासूनच पाणीपुरवठा करणार्‍या जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. त्यातच वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मुर्दापूर, बेळी येथील पाणी पुरवठा गावास होत आहे. १० ते १२ दिवसाआड पाणी मिळत असल्याने टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतीने पर्यायाने एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी धाव घेतली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एमआयडीसीचे पाणी ग्रामस्थांना मिळाले. वाघूर, मूर्दापूर, एमआयडीसी मिळून गावाला सध्या चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. एमआयडीसीच्या पाण्याने टंचाईची तिव्रता कमी झाली असली तरी शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट होत आहे.
फेसयुक्त, पिवळसर, दूषित पाण्याची ओरड नागरिकांमधून होत असली तरी टंचाईची तीव्रता कमी झाल्याबाबत दिलासा आहे. दूषित पाण्यामुळे तोंड येणे, पोटात बिघाड आदी समस्यांची ओरड होत आहे. एमआयडीसीचे पाणी जास्त दिवस साठवण केल्यास बारीक आळी पडताना दिसत आहे.
दरम्यान, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळविण्यासाठी नागरिक पायपीट करीत आहे. १० ते २५ रुपयांपर्यंत मिळणार्‍या मिनरल वॉटर,जार यांना मागणी वाढली आहे.

चौकट
एमआयडीसीचे पाणी दूषित
एमआयडीसीचे पाणी पिवळसर व फेसयुक्त दूषित असल्याचा आरोप माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत केला होता. पाणीसाठा मुबलक आहे मात्र त्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण आतापासून ग्रामपंचायतीने करणे आवश्यक आहे. मूर्दापूर धरणाजवळील विहिरीचा व्यास व खोल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारण होईल व पर्यायाने एमआयडीसीचे पाणी घ्यावे लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.