शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी

By admin | Updated: October 1, 2016 23:36 IST

विविध विकासकामाच्या मागणीचे इगतपुरी पंचायत समिती पदाधिका-यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा याना निवेदन

विविध विकासकामाच्या मागणीचे इगतपुरी पंचायत समिती पदाधिका-यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा याना निवेदनतालुक्यातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणीघोटी : इगतपुरी तालुक्याचा आदिवासी क्षेत्रात समावेश असून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास विभागामार्फत विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध होतो.परंतु शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवाना विकासापासून वंचित राहावे लागते.इगतपुरी तालुक्यातील विविध विकासकामाच्या मागणी व निर्माण होणा-या अडचणी दूर कराव्यात याबाबतचे निवेदन इगतपुरी पंचायत समतिीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सावरा यांना दिले.पंचायत समतिीच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सावरा यांची भेट घेतली.व निवेदन दिले.या निवेदनात स्पष्ट करण्यात आले कि,तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी इमारती,व शाळा दुरु स्ती साठी निधी,संरक्षक भीती,अंगणवाडी इमारती साठी मंजुरी,तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती असूनही काही ग्रामपंचायतचा पेसा मध्ये समावेश नाही,त्यांचा पेसा मध्ये समावेश करून निधी मिळावा, ठक्कर बाप्पा योजनेचा ग्रामपंचायत निधीची मर्यादा वाढवून दयावी.२००६ ते २००७ च्या दारिद्रय रेषेच्या यादीतील वंचित नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, रस्ते दुरु स्ती व नूतनीकरण यासाठी निधी मिळावा, विविध भागातील रिक्त असलेले कर्मचारी भरणे व प्रतिनियुक्ती वर असलेले कर्मचारी मूळस्थानी कामावर पाठविण्यात यावेत , तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामपंचायतमध्ये झालेल्या घटनांची चौकशी न करता त्यांना पाठीशी घालणा-याची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान यावेळी ना.सावरा यांनी सदर मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.या शिष्ट मंडळात पंचायत समतिीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांच्यासह माजी आमदार शिवराम झोले,माजी सभापती निवृत्ती जाधव,लक्ष्मण (लकी)जाधव ,बाळू धांडे आदींचा समावेश होता.(वार्ताहर)