शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 03:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मथुरेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय तपास संस्थेद्वारे (सीबीआय) चौकशीचे आदेश देण्यास मंगळवारी नकार दिला.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मथुरेत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय तपास संस्थेद्वारे (सीबीआय) चौकशीचे आदेश देण्यास मंगळवारी नकार दिला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश इम्तियाझ मुर्तझा यांच्यामार्फत चौकशी करण्याचे ठरवले आहे. ही न्यायालयीन चौकशी असेल. मथुरेतील हिंसाचारामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण २९ लोक ठार झाले होते.न्यायमूर्तीद्वय पी.सी. घोष आणि अमिताव रॉय यांच्या पीठाने या प्रकरणी कुठलाही आदेश देण्यास नकार देताना याचिकाकर्त्यास अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली. दिल्ली भाजपाचे प्रवक्ता अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली होती. मथुरेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ज्येष्ठ वकील गीता लुथरा यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने सांगितले होते. समाजवादी पार्टीच्या नेतृत्वातील सरकारद्वारे सीबीआय चौकशीच्या कुठल्याही हालचाली नसून राज्यातील तपास संस्था जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत नसल्याचा आरोपही याचिकेत होता. (वृत्तसंस्था)>रामवृक्षच्या दहशतीची सरकारला होती माहितीउत्तर प्रदेशच्या मथुरेतील जवाहरबाग हिंसाचाराने संपूर्ण देशात राजकीय वादळ निर्माण झाले असतानाच या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजांवरून सरकारी दाव्यांच्या विपरीत वेगळेच वास्तव समोर आले आहे.जवाहरबाग पार्कमध्ये रामवृक्ष यादवच्या काळ्या साम्राज्याची इत्थंभूत माहिती सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फार पूर्वीपासून होती, हे न्यायालयीन कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.