नवी दिल्ली : पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करीत आज दिल्ली विद्यापीठाने, या मुद्याला सोडविण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांकडून आलेल्या प्रस्तावालाच आयोगाकडे पाठवून चेंडू पुन्हा टोलवला आहे.
वादग्रस्त ठरलेल्या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला परत घेणो व जुन्या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी आज सकाळची मुदत आयोगाकडून निश्चित करण्यात आली होती. आयोगाच्या या आदेशाला उत्तर देताना दिल्ली विद्यापीठाने चेंडू टोलवला.