शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अर्पण थॅलेसेमिया सोसायटी राष्ट्रीय परिषदेत सन्मानित

By admin | Updated: March 24, 2015 23:52 IST

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील १८१ थॅलेसेमियापीडित रुग्णांना अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा करतानाच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही विनामूल्य करणार्‍या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या कार्याची दखल मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आली असून, सोसायटीचा उपक्रम एक रोल मॉडेल म्हणून संबोधिला गेला आहे. परिषदेत नामवंतांच्या उपस्थितीत सोसायटीला सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील १८१ थॅलेसेमियापीडित रुग्णांना अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा करतानाच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही विनामूल्य करणार्‍या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या कार्याची दखल मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आली असून, सोसायटीचा उपक्रम एक रोल मॉडेल म्हणून संबोधिला गेला आहे. परिषदेत नामवंतांच्या उपस्थितीत सोसायटीला सन्मानित करण्यात आले आहे. लालबाग येथे मुंबई हिमॅटोलॉजी या संस्थेच्या वतीने देशभरातील रक्तविकार तज्ज्ञांची (हिमॅटोलॉजिस्ट) राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत देशभरातील १५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होत उपक्रमांचे सादरीकरण केले. याचवेळी नाशिकच्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून आयएमए शाखेच्या सहकार्याने चालविल्या जाणार्‍या थॅलेसेमिया केअर सेंटरची माहिती अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी सादर केली. अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या या कार्याने प्रभावित होऊन प्रख्यात रक्तविकार तज्ज्ञ डॉ. एम. बी. अग्रवाल यांनी सोसायटीच्या वतीने राबविली जाणारी उपचार पद्धती ही भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती असल्याचे गौरवोद्गार काढले. अत्याधुनिक तंत्राद्वारे नॅट टेस्टेड रक्तच अतिसुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अर्पण थॅलेसेमिया सोसायटीला नामवंतांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून वाडिया हॉस्पिटलचे डॉ. मुकेश देसाई, डॉ. घोष, केईएमचे डॉ. फराह जीजीना यांनी काम पाहिले. याप्रसंगी अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉ. नंदकिशोर तातेड, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आनंद देशपांडे, राजेश सावंत, टाटा हॉस्पिटलचे डॉ. राजाध्यक्ष आदि उपस्थित होते. सोसायटीचा बहुमानअर्पण थॅलेसेमिया सोसायटीमार्फत सेवाभावी वृत्तीने थॅलेसेमिया पीडितांवर मोफत उपचार केले जात आहेत. सोसायटीच्या याच कामाची पावती राष्ट्रीय परिषदेत मिळाली, हा आम्ही मोठा बहुमान समजतो. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे आणि त्यासाठी दात्यांचेही सहकार्य लाभते आहे. - डॉ. नंदकिशोर तातेड, चेअरमन, अर्पण रक्तपेढीफोटो कॅप्शन-अर्पण थॅलेसेमिया सोसायटीला रक्तविकार तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेत गौरविण्यात आले. परिषदेत दिलेल्या प्रशस्तिपत्रासह डॉ. रत्नाकर कासोदकर, अर्पण रक्तपेढीचे व्हाईस चेअरमन डॉ. अतुल जैन, डॉ. शशिकांत पाटील व डॉ. स्नेहल पाटील.