शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहा कोटी परत मिळण्याबाबत संभ्रम आदेश: जिल्हाधिकार्‍यांनी वर्ग केले होते अनुदान

By admin | Updated: May 11, 2016 22:14 IST

जळगाव : महापालिकेस मंजूर १० कोटी ६७ लाखाचे अनुदान जिल्हाधिकार्‍यांनी परस्पर वळते करून घेतल्याप्रकणी शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. सात दिवसात ही रकम मनपाकडे वळते करावी असे निर्देश आहेत. या संदर्भात महपौर नितीन ल‹ाही दुजोरा दिला मात्र दिलेला निधी परत मिळणे कठीण असल्याची प्रतिक्रीया जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्याने या प्रश्नी अद्यापही संभ्रमच आहे.

जळगाव : महापालिकेस मंजूर १० कोटी ६७ लाखाचे अनुदान जिल्हाधिकार्‍यांनी परस्पर वळते करून घेतल्याप्रकणी शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. सात दिवसात ही रकम मनपाकडे वळते करावी असे निर्देश आहेत. या संदर्भात महपौर नितीन ल‹ाही दुजोरा दिला मात्र दिलेला निधी परत मिळणे कठीण असल्याची प्रतिक्रीया जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्याने या प्रश्नी अद्यापही संभ्रमच आहे.
विविध योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी कोणत्याही प्रकारची कपात न करता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस तत्काळ वितरित करण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने ११ रोजी आदेश काढले आहेत.
महापालिकेचा निधी केला होता वर्ग
महापालिकेस मार्च महिन्यात विकास कामांसाठी १० कोटी ६७ लाख १४ हजार ८०६ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शिक्षण कर, रोजगार हमी, उपकर व बिनशेती कर या घेणे असलेल्या शासकीय देणी पोटी वळते करून घेतला होता. सद्य स्थितीत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या महापालिकेचा एवढा मोठा निधी वळता करून घेतला गेल्यामुळे मनपा क्षेत्रात खळबळ उडाली होती.
महापौरांनी केला पत्रव्यवहार
हा निधी परत मिळावा म्हणून महापौर नितीन ल‹ा यांनी जिल्हाधिकारी, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांची भेटही त्यांनी याप्रश्नी घेतली होती. हा निधी जिल्हा प्रशासनाने परस्पर वळता करून घेतल्याप्रकरणी नरगविकास सचिवांनी जिल्हाधिकार्‍यांना नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेशही दिले होते. नगरविकास विभागाकडून याप्रश्नी अगोदरच सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
आदेश संपूर्ण राज्यासाठी
नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, शासनाकडून विविध योजनांच्या अनुषंगाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ संबंधित संस्थाना कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित केला जावा. हा निधी सात दिवसात दिला जावा असेही निर्देश नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहेत.
स्पष्ट आदेश
निधी बाबत शासनाच्या नगर विकास विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे आपण आशावादी आहोत.
-नितीन ल‹ा, महापौर.