शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हरकतींच्या निकालाला विलंब, आज होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

By admin | Updated: March 24, 2015 23:54 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : पाचशे मतदार वाढले?

जिल्हा बॅँक निवडणूक : पाचशे मतदार वाढले?नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्राप्त तक्रारी व हरकतींवर वेळापत्रकानुसार २३ मार्चला निकाल देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४ मार्चच्या सायंकाळपर्यंतही निकाल देण्यास विलंब झाल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे २५ मार्चला अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दरम्यान, विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. आरिफ यांना नियोजित वेळापत्रकानुसार २३ मार्चलाच प्राप्त हरकतींवर निकाल देणे अपेक्षित असताना या निकालाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आल्याचे, तसेच २४ मार्चच्या सायंकाळपर्यंत निकाल तयार करण्याचेच काम सुरू असल्याचे समजते.अगोदर असलेल्या सुमारे चार हजारांच्या आसपास मतदारांमध्ये प्राप्त ५४७ तक्रारींपैकी बहुसंख्य तक्रारी या पाच हजार रुपयांच्या भागभांडवलाच्या असल्याच्या व त्या स्वीकारण्यात आल्याने जिल्हा बॅँकेच्या एकूण मतदारांमध्ये सुमारे पाचशेने वाढ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदारांची संख्या सुमारे साडेचार हजाराच्या घरात पोहोचल्याचे कळते. प्रत्यक्षात २५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत यादी जाहीर झाल्यानंतरच मतदारांची अंतिम संख्या कळणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २५ मार्च रोजीच यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या अंतिम प्रारूप याद्या विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह तालुका सहनिबंधक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदार यादीवर ५४७ तक्रारी व ६९ हरकती प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व ६९ तक्रारींवर निकाल देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)इन्फो..बुधवारी होणार सुनावणीदरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या अपहार व भ्रष्टाचाराला स्थगिती देण्याच्या तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाविरोधात, तसेच या दोषी संचालकांसह राज्य शासन व सहकार आयुक्त यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी (दि.२५) सुनावणी होणार असल्याचे समजते. आधी ही सुनावणी २० मार्चला होणार होती. जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी ही याचिका दाखल केली आहे.