कापसावरील रोगांचा वेळीच नायनाट करा
By admin | Updated: December 14, 2015 00:17 IST
नागपूर : कापसाच्या देशी प्रजाती आणि उच्च सघनता याबाबत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थानचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. विनिता गोतमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कापसावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळीट नायनाट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. हायब्रीड किंवा बी. टी कापसाच्या जागी देशी प्रजातीचे कापूस लावणे शेतकऱ्यांना लाभदायी आहे. कारण देशी प्रजातीचा कापूस संबंधित वातावरणात अधिक चांगले पीक देऊ शकतो. वर्तमानात लावण्यात येणाऱ्या कापसाचे पीक बऱ्याच दूर अंतरावर लावले जाते. त्यामुळे ही रोपे जास्त जागा घेरतात. त्यामुळे या पिकाला पाण्याचीही जास्त गरज लागते. एकूण गुंतवणुकीच्या प्रमाणात यात लाभ कमी मिळतो. त्यापेक्षा याच जागी देशी प्रजातीचा कापूस सूरज ही प्रजाती जवळजवळ लावता येते. यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढू शकते आणि त्यांचा घेरह
कापसावरील रोगांचा वेळीच नायनाट करा
नागपूर : कापसाच्या देशी प्रजाती आणि उच्च सघनता याबाबत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थानचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. विनिता गोतमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कापसावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळीट नायनाट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. हायब्रीड किंवा बी. टी कापसाच्या जागी देशी प्रजातीचे कापूस लावणे शेतकऱ्यांना लाभदायी आहे. कारण देशी प्रजातीचा कापूस संबंधित वातावरणात अधिक चांगले पीक देऊ शकतो. वर्तमानात लावण्यात येणाऱ्या कापसाचे पीक बऱ्याच दूर अंतरावर लावले जाते. त्यामुळे ही रोपे जास्त जागा घेरतात. त्यामुळे या पिकाला पाण्याचीही जास्त गरज लागते. एकूण गुंतवणुकीच्या प्रमाणात यात लाभ कमी मिळतो. त्यापेक्षा याच जागी देशी प्रजातीचा कापूस सूरज ही प्रजाती जवळजवळ लावता येते. यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढू शकते आणि त्यांचा घेरही कमी होतो. जमीन कमी असेल तर प्रती एकर ४० हजार रोपे लावल्यावर यात कापसाचे उत्पादन जास्त मिळते. त्याचप्रमाणे दुसरी प्रजाती फुले धन्वंतरी आहे. वैद्यकीय क्षेत्राला लागणारा कापूस यातून उत्पादित करता येतो. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. या दोन्ही प्रजातीत रोग प्रतिरोधकता आणि कीड प्रतिरोधकता जास्त आहे. पारंपरिक स्वरूपात बीटी कॉटन आणि हायब्रीड कॉटन उत्पादन करणारे शेतकरी या पद्धतीने जास्त लाभ मिळवू शकतात.