शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यांचा निर्णय मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिका : निविदा व जागेबाबत होणार चर्चा

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा निर्णय अखेर श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे.

श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा निर्णय अखेर श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे.
या पुतळ्यांसाठी नगरपालिकेने ई निविदा बोलाविल्या आहेत. त्यावर २१ जुलैस नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा सध्या रेल्वेस्थानकाजवळील लुंबिनी बुद्ध विहारासमोर असलेल्या अर्धाकृती पुतळ्याच्याच जागेवर बसविण्यात येणार आहे. मात्र छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकात बसवायचा की अन्य जागेत यावरच बर्‍याच वर्षांपासून खल सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा शिवाजी चौकात पुतळा बसविण्याचा आग्रह आहे. तर नगरपालिकेचे कारभारी त्यास तयार नाहीत. त्याऐवजी सध्याच्या जागेत किंवा प्रस्तावित नेहरू भाजी मंडईच्या नव्या इमारतीच्या बाहेरील बाजूने पोलीस ठाण्याजवळ तसेच पीपल्स बँकेच्या भाजी मंडई शाखा अशा काही जागांच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. नगरपालिकेची पुतळ्यासाठी तयारी असली तरी हिंदुत्ववादी संघटनांचे जागेबाबत एकमत नसल्याने जागेचा पेच कायम आहे. या पुतळ्यासाठी दरवर्षी शिवजयंतीदिनी उपोषण आंदोलनेही करण्यात येत आहेत.
नगरपालिकेची सर्वसाधारण मंगळवारी होत आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पालिकेने यापूर्वीच ई निविदा बोलाविल्या आहेत. या प्राप्त निविदा तसेच छत्रपती पुतळ्याची जागा निश्चित करण्याबाबतचे दोन स्वतंत्र विषय ठेवण्यात आले आहेत. न्यायालय, केंद्र व राज्य सरकारांनी पुतळे बसविण्यास निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर या सभेत पुतळ्यांबाबत काय निर्णय होतो? याकडे श्रीरामपूरमधील शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)