शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या अर्जावरील निर्णय १८ एप्रिलला

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, या सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.

मुंबई : किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, या सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.विजय मल्ल्या यांच्यावर कट रचल्याचा व अन्य गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच आयडीबीआय बँकेने किंगफिशर एअरलाईन्स लि. ला दिलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जाबाबतही केस नोंदवण्यात आल्याचे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाला सांगितले.या प्रकरणी मल्ल्या यांच्यावर सीबीआयनेही केस नोंदवली आहे. मल्ल्या यांनी बँकेने दिलेल्या ९०० कोटी रुपयांपैकी ४३० कोटी रुपये युरोपमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात खर्च केले, अशीही माहिती अ‍ॅड. वेणेगावकर यांनी न्या. पी. व्ही. भावके यांना दिली. ‘मल्ल्या यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता तीन समन्स बजावले. मात्र त्यांनी त्यांच्या सोयीनुसार चौकशीकरिता उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीला स्वत:च्या सोयीनुसार चौकशीसाठी हजर राहण्याचा अधिकार नाही. हे तपासअधिकाऱ्यावर अवलंबून आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. वेणेगावकर यांनी केला. मल्ल्या त्यांची परदेशातील मालमत्ता विकण्याची व पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास तपास यंत्रणेच्या व बँकेच्या हाती काहीही लागणार नाही, असेही अ‍ॅड. वेणेगावकर यांनी विशेष न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)