शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणविरोधी टिप्पणीवरून वाद

By admin | Updated: December 19, 2015 01:48 IST

देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या दोन गोष्टी कुठल्या असतील तर त्या भ्रष्टाचार आणि आरक्षण आहे, असे वादग्रस्त मत नोंदवत आरक्षणविरोधी भूमिका मांडणारे गुजरात उच्च न्यायालयाचे

नवी दिल्ली : देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या दोन गोष्टी कुठल्या असतील तर त्या भ्रष्टाचार आणि आरक्षण आहे, असे वादग्रस्त मत नोंदवत आरक्षणविरोधी भूमिका मांडणारे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जेबी पारदीवाला यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची मागणी राज्यसभेच्या ५८ खासदारांनी केली आहे. दरम्यान महाभियोगाच्या या मागणीदरम्यान पारडीवाला यांनी आपल्या आदेशातून संबंधित वादग्रस्त टिप्पणी काढून टाकली आहे.पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्याविरोधातील एका खटल्यासंदर्भातील आदेशात पारदीवाला यांनी संबंधित वादग्रस्त टिप्पणी केली होती. दोन गोष्टींनी देशाची वाट लावली आहे. एक म्हणजे आरक्षण आणि दुसरी म्हणजे भ्रष्टाचार. आपली राज्यघटना साकारली तेव्हा आरक्षण केवळ १० वर्षांसाठी राहिले, असे मानले गेले होते. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतरही ते जारी आहे, अशी टिप्पणी न्या. पारदीवाला यांनी केली होती. त्यांच्या या टिप्पणीविरोधात राज्यसभेच्या ५८ खासदारांनी शुक्रवारी सभापतीसमक्ष याचिका दाखल करून न्या, पारदीवाला यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची मागणी केली. न्या. पारदीवाला यांची आरक्षणासंदर्भातील टिप्पणी क्लेषदायी आणि राज्यघटनेचा अपमान करणारी असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. यासाठी राज्यसभेत त्यांच्याविरुद्ध महाभियोग खटला चालविण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरक्षणासंदर्भातील टिप्पणी गाळली- टिप्पणीवरून वाद उसळताच न्या. पारदीवाला यांनी शुक्रवारी आपल्या पूर्व आदेशातून संबंधित टिप्पणी काढून टाकली. - आदेशात दुरुस्ती करून त्यातील वादग्रस्त अंश गाळून टाकण्याची मागणी गुजरात सरकारने केली होती. - गुजरात सरकारच्या अर्जावर सुनावणी करताना न्या. पारदीवाला यांनी संबंधित आदेशातील वादग्रस्त अंश गाळून टाकला.