रत्नागिरीत सुमद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
- पुण्यातील अभियंता : तिघांना वाचवण्यात यशगुहागर/गणपतीपुळे (रत्नागिरी) : गुहागर व गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडालेल्या चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला.मोहित कौशिक (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. मोहित कौशिक, राकेशचंद्र शर्मा (२३), आकाश रवींद्रकुमार शिण्णोई (२२), ...
रत्नागिरीत सुमद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
- पुण्यातील अभियंता : तिघांना वाचवण्यात यशगुहागर/गणपतीपुळे (रत्नागिरी) : गुहागर व गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडालेल्या चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला.मोहित कौशिक (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. मोहित कौशिक, राकेशचंद्र शर्मा (२३), आकाश रवींद्रकुमार शिण्णोई (२२), शुभम शर्मा, दीपाली जैसवाल (२३), रजत गुप्ता (२३) हे पुण्यातील हिंजवाडी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. स्वातंत्र्यदिनाची सुी असल्याने ते गणपतीपुळे येथे फिरायला आले होते. दुपारी ३.३० वाजता चार तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र मोहित व रजत पाण्यात बुडायला लागल्याने स्थानिक व्यापार्यांनी समुद्रात उड्या घेऊन त्यांना बाहेर काढले. त्यांना आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मोहितला मृत घोषित केले, तर रजतला उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. त्याची प्रकृती सुधारत आहे.मोहितचे नातेवाईक दिल्लीवरून रत्नागिरीत येत आहेत. त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दुसर्या घटनेत गुहागर समुद्रकिनारी शनिवारी दुपारी ४ वाजता सिद्धेश (१६) व सुरेश सदानंद उदेक (१८, चिपळूण कळवंडे, सध्या रा. पुणे) हे दोघे भाऊ बुडत असताना त्यांना स्थानिकांनी वाचविले. (प्रतिनिधी)