निधन वार्ता
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
दिनकर बोरकुटे
निधन वार्ता
दिनकर बोरकुटेअ.भा. महानुभाव महामंडळाचे अध्यक्ष राणी लक्ष्मीनगर येथील रहिवासी दिनकर भास्करराव बोरकुटे यांचे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर अमरावती येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते जागतिक महानुभाव वासनिक परिषद, चक्रधरस्वामी स्थान जीर्णोद्धार प्रतिष्ठान आदींवर पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. पुष्पलता सहस्रबुद्धेफोटो - स्कॅनशंकरनगर येथील रहिवासी पुष्पलता रणछोडजी सहस्रबुद्धे (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. ब्रिजराणी खन्नाफोटो - स्कॅनरेल्वे निवास, माऊंट रोड येथील रहिवासी ब्रिजराणी गणेशप्रसाद खन्ना (९२) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्या द.पू.म. रेल्वे राजभाषा विभागाचे सुरेंद्रकुमार खन्ना यांच्या आई होत. पौर्णिमाबेन सुखदेवेइंदोरा, भंडारा मोहल्ला येथील रहिवासी पौर्णिमाबेन सुखदेवे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मधुकर डाखोरेफोटो - स्कॅनअयोध्यानगर येथील रहिवासी तेली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर बापुराव डाखोरे (५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. यशवंत मोहरीरफोटो - रॅपमध्ये मॉडर्न सोसायटी, प्रतापनगर येथील रहिवासी निवृत्त अतिरिक्त विक्रीकर आयुक्त यशवंत गोपाळ मोहरीर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मनोहर पंडितएलआयजी कॉलनी, कुकडे लेआऊट येथील रहिवासी मनोहर कृष्णराव पंडित (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलादेवी लोयाफोटो - स्कॅनकमलादेवी किसनगोपाल लोया (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.