शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आनंद साजरा करण्यासाठी हवेत केलेल्या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू

By admin | Updated: February 18, 2016 10:59 IST

वरातीत नाच गाणे सुरु असताना आनंदाच्या भरात काही अतिउत्साही नातेवाईक, मित्रमंडळीनी हवेत केलेल्या गोळीबारीत नवरदेवाचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

सीतापूर -  लग्नाच्या वरातीत नाच गाणे सुरु असताना आनंदाच्या भरात काही अतिउत्साही नातेवाईक, मित्रमंडळीनी हवेत केलेल्या गोळीबारीत नवरदेवाचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. 
 
वरात लग्नमंडपाजवळ पोहोचताच वरातीतीतल काही जणांनी हवेत गोळीबार सुरु केला. त्यावेळी अचानक एक गोळी घोडयावर बसलेल्या नवरदेवाच्या डोक्यात घुसली आणि तो जागीच कोसळला. नवरदेवाला लगेच सीतापूर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 
 
तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर लखनऊ येथे नेण्यास सांगितले. लखनऊ येथे नेत असताना वाटेतच नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू झाला आणि आनंदाचे वातावरण दु:खामध्ये बदलून गेले. गोळीबार करणा-याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींची जबानी नोंदवून घेतली.