शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद, हाफिजने निश्चिंत राहू नये

By admin | Updated: September 8, 2015 04:06 IST

दाऊद इब्राहीम, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांच्यासारख्या भारताच्या शत्रूंनी आपल्याबद्दल भारत विचारच करणार नाही असा विश्वास बाळगू नये, त्यांना संपविण्यासाठी

नवी दिल्ली : दाऊद इब्राहीम, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांच्यासारख्या भारताच्या शत्रूंनी आपल्याबद्दल भारत विचारच करणार नाही असा विश्वास बाळगू नये, त्यांना संपविण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिला.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि भारताला हवा असलेला सईद पाकिस्तानात शांततेत जगत आहे. सरकार त्यांच्याबाबत काय करीत आहे, असा प्रश्न त्यांना आजतक वाहिनीच्या ‘सिधी बात’ या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. मोदी सरकार येऊन १५ महिने उलटले आहेत. विशेष मोहीम, की छुपी मोहीम छेडली जाणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, विशेष मोहीम म्हणा किंवा छुपी मोहीम असो, ती पार पाडल्यानंतरच त्याची माहिती द्यायची की नाही हा निर्णय सरकारवर अवलंबून असतो. अशा मोहिमा पार पाडल्यानंतरच त्याबाबत वाच्यता केली जाते.पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या फरार आरोपींबाबत दस्तऐवज (डोझियर) तयार करण्याशिवाय काहीही करण्यात आलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी डोझियरशिवाय साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबले जातील, असे स्पष्ट केले.दाऊदच्या मालमत्तेवर जप्ती संयुक्त अरब अमिरातने (यूएई)दाऊदची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचा दौरा केला तेव्हा त्याबाबत करार झाला होता. पंतप्रधानांसोबत दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यावेळी यूएईकडे दाऊदच्या मालमत्तेसंबंधी यादी सोपविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)